तोपर्यंत मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा,राज्यपालांकडे बीडच्या शेतकऱ्याची मागणी !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्यात सत्तासंघर्ष टिपेला पोहचला आहे.एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात पुकारलेलं बंड निर्णायक वळणावर येऊन ठेपलं आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोणत्याही क्षणी पडू शकते अशी एकिकडे परिस्थिती निर्माण झालेली असतानाच राज्यातील सत्ता नाट्य संपेपर्यंत प्रभारी मुख्यमंत्री म्हणून आपल्याला नियुक्ती द्यावी अशी मागणी एका शेतकऱ्याने महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे केलीय.

बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्यपालांना पत्र पाठवलं आहे. श्रीकांत विष्णू गदळे असं या शेतकऱ्याचं नावं आहे. या शेतकऱ्याने २२ जून रोजी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्याची मागणी करणारं पत्र सादर केलं आहे.मात्र हे पत्र आज समाजमाध्यमांवर वायरल झाले आहे.

चालू विधानसभेचा कार्यकाळ संपला असून, राज्यात घटनात्मक पेच प्रसंग निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी प्रभारी मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करावी अशी मागणी या पत्राद्वारे बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे श्रीकांत विष्णू गदळे या शेतकऱ्याची माहिती समोर येताच या शेतकऱ्याची राज्यात जोरदार चर्चा रंगली आहे.

एकनाथ शिंदेंनी शिवसेनेला ठणकावले, तुमच्या धमक्यांना आम्ही भिक घालत नाही

श्रीकांत विष्णू गदळे या शेतकऱ्याने राज्यपाल यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, मी शेतकरी पुत्र श्रीकांत विष्णू गदळे राहता दहिफळ (वडमाऊली) तालुका केज, जिल्हा बीडचा रहिवाशी आहे. मी १० ते १२ वर्षांपासून राजकारण आणि समाजकारणात अग्रेसर आहे. शेतकरी गोरगरिबांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करत आहे. सध्या महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं आहे. त्यामुळे येथील शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. अशावेळी सरकारने तात्काळ मदत करणे अपेक्षित होती. मात्र ती मिळाली नाही.

.. अन् राम शिंदेंच्या आश्रूंचा बांध फुटला !

मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्ष सत्तेत राहून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलेले आहे. राज्यावर नैसर्गिक आपत्ती कोसळली असताना सत्तेत राहून कोणत्याही प्रकारची मदत शेतकऱ्यांना, सर्वसामान्य नागरिकांना दिलेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना काळजीवाहू अथवा प्रभावी मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती न देता मला प्रभारी मुख्यमंत्री म्हणून संधी द्यावी.

आमदार राम शिंदे विजयोत्सव : सिध्दटेक ते जामखेड गुलालाची प्रचंड उधळण, राम शिंदेंचे मतदारसंघात अभूतपूर्व स्वागत, भाजपचे जोरदार शक्तीप्रदर्शन !

मी जनतेचे सर्व प्रश्न मार्गी लावेन. बेरोजगारी, आत्महत्याग्रस्त शेतकरी, शेतमजूर, ऊतोड कामगार या सर्वांना न्याय देण्याचं काम मी करेन. विविध प्रश्न सोडवण्यासाठी आपण तात्काळ माझी नियुक्ती करावी ही विनंती. राज्याचे राज्यपाल माझ्या पत्राची दखल घेऊन मला प्रभारी मुख्यमंत्री म्हणून जनतेची सेवा करण्याची संधी देतील, असा विश्वासही गदळे यांनी व्यक्त केलाय. (Trending news, make me the Chief Minister of Maharashtra, demand of Beed farmer shrikant vishnu gadale to the Governor)