Ranbir Hot In Shamshera । रणबीर कपूरच्या अगामी शमसेरा चित्रपटाचे पोस्टर लिक, पहा रणबीरचा जबरदस्त लुक !

मुंबई  : बाॅलीवुड अभिनेता रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) अगामी ब्रह्मास्त्र (Brahmastra) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रसिद्ध झाला. या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली असतानाच रणबीर कपूर संदर्भात आणखीन एक बातमी समोर आली आहे. (Leak poster of Ranbir Kapoor’s upcoming movie Shamsera, see Ranbir’s great look)

शमशेरा या आगामी चित्रपटात रणबीर कपूर हा झळकता दिसणार आहे. या चित्रपटात वाणी कपुर आणि संजय दत्त यांच्याही भूमिका आहेत (shamshera cast) ब्रह्मास्त्र बरोबरच शमशेरा विषयी रणबीरच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. शमशेरा या चित्रपटाचे पोस्टर लिक झाले आहे. पोस्टर लिक होताच सोशल मिडीयावर याची जोरदार चर्चा रंगली आहे. (new poster of Ranbir Kapoor from Shamshera has been leaked)

रणबीर कपूरची भूमिका असलेल्या शमशेरा या चित्रपटाचे पोस्टर कोणीतरी लिक केले आहे. अल्पावधीत हे पोस्टर सोशल मिडीयावर प्रचंड वायरल झाले आहे. वायरल झालेल्या पोस्टरमध्ये रणबीर कपूर अतिशय धाकड लुकमध्ये दिसत आहे. शमसेरा, shamshera आणि RanbirHotInShamshera हे हॅशटग ट्रेण्डमध्ये आहेत.

रणबीर कपूरच्या वायरल झालेल्या पोस्टरमध्ये रणबीरचा लुक अतिशय रुबाबदार दिसत आहे. लांब केस असलेल्या रणबीरच्या हातात एक हत्यार पहायला मिळत आहे. त्याचा हा लुक पाहून त्याचे चाहते खुश असल्याचे दिसत आहेत. हा चित्रपट कधी प्रदर्शित होतो याचीच उत्कंठा शिगेला पोहचली आहे. शमसेरा हा चित्रपट येत्या 22 जुलै ला रिलीज होण्याची शक्यता आहे. अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.

Leak poster of Ranbir Kapoor's upcoming movie Shamsera, Ranbir Hot In Shamshera, see Ranbir's great look,
Photo Credit 📸 twitter