अभिजित बिचुकले लढवणार राष्ट्रपतीपदाची निवडणूक ? । Abhijit Bichukale to contest presidential election 2022 ?

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्रात विधान परिषद (Maharashtra vidhan parishad election 2022) देशात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची (Presidential election 2022) धामधूम सुरु आहे. देशाचे नवे राष्ट्रपती कोण असणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. अश्यातच महाराष्ट्रातून राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीसाठी बिग बाॅस फेेम अभिजीत बिचुकले (abhijit bichukale bigg boss) यांचं नाव चर्चेत आलं आहे.

बिग बाॅस फेेम अभिजीत बिचुकले (abhijit bichukale bigg boss)  हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रकाशझोतात असतात, आपल्या रोखठोक वादग्रस्त मतांमुळे ते नेहमी चर्चेत असतात, त्यांनी अनेक निवडणुकांमध्ये नशीब आजमावून पाहिले आहे.

यंदा होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे उमेदवार म्हणून ते रिंगणात उतरणार असल्याचे अनेक मिडीया रिपोर्ट्समधून सांगितले जात आहे.100 आमदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी आमदारांच्या संपर्कात असल्याचा दावा बिचुकले यांनी एका मुलाखतीत केला आहे.

राष्ट्रपतीपदासाठी इच्छुक आहात का आणि  पुढची भूमिका काय असणार आहे ? असा प्रश्न बिचुकले यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना अभिजीत बिचकुले म्हणाले, गेल्या पंचवार्षिक राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीसाठी मोदी साहेबांना मी पत्र लिहिलं होतं की, मला तुम्ही राष्ट्रपती करा. तरूण वयात राष्ट्रपती व्हायचयं.

पण, मी आता वेगळा मार्ग निवडला आहे. येत्या दोन दिवसांमध्ये जर १०० आमदारांंच्या सह्या मिळाल्या तर आपला अर्ज तिथे दाखल होईल, असं बिचुकले म्हणाले. असे वृत्त लोकसत्ताने दिले आहे.