खर्डा परिसरात भुरट्या चोरट्यांचा सुळसुळाट, चोरट्यांनी मारला कोंबड्यांवर डल्ला

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरात भुरट्या चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. चोरट्यांनी तेलंगशी रोडवरील एका कोंबड्यांच्या शेडमधील कोंबड्यांवर डल्ला मारण्याची घटना उघडकीस आली आहे.

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील संतोष थोरात यांचे खर्डा – तेलंगशी रस्त्यावरील गवळवाडी शिवारातील शेतात कोंबड्याचे शेड आहे. या शेडचा अज्ञात चोरट्यांनी कडी कोयंडा तोडून शेडमधील ९६००( नऊ हजार सहाशे) रुपये किमतीचे ३२ गावरान (नर, मादी) कोंबड्या चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी संतोष थोरात यांनी खर्डा पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डा पोलिस करत आहेत.

खर्डा येथे नव्यानेच पोलीस स्टेशन कार्यरत झाले. या भागातील भुरट्या चोऱ्या, छोट्या मोठ्या चोऱ्या यावर नियंत्रण मिळवण्याचे मोठे आव्हान आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी खर्डा पोलिसांना मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.