अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त रोहित पवारांच्या ‘हटके’ शुभेच्छा

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्याच्या आजी माजी उपमुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आज साजरा केला जात आहे. माजी उपमुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार यांना आमदार रोहित पवार यांनी हटके शुभेच्छा दिल्या आहेत. (Best wishes from Rohit Pawar on the occasion of Ajit Pawar’s birthday)

देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज पोस्टर, तसेच वर्तमानपत्र, टिव्हीवर कोणत्याही प्रकाराची जाहिरात न देण्याचे भाजपच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.तर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने होणारा खर्च हा पुरग्रस्त लोकांनासाठी देण्यात यावा असं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे.

जाहिरात

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने अनेकांनी सोशल मीडियावर वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांना वाढदिवसाच्या निमित्ताने हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

जामखेड तालुका मीडिया क्लबने निर्माण केला नवा आदर्श – पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड

त्यांनी त्यासंदर्भात एक पोस्ट देखील केली आहे.रोहित पवार यांनी अजित पवारांना शुभेच्छा देताना असं म्हटलं आहे की, प्रशासनावर जबरदस्त पकड असलेले महाराष्ट्रातील स्ट्रेट फॉरवर्ड नेते, कामासाठी दादा व्यक्तिमत्त्व आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांना वाढदिवसानिमित्त मन: पुर्वक शुभेच्छा. दादांना निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना असे ट्विट पवार यांनी केले आहे.

आमदार रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील वाढदिवसानिमत्ताने शुभेच्छा दिल्या आहेत.