CM Jal Samvardhan Yojana | मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेतून 69 जलाशयांच्या दुरुस्तीची कामे मंजूर, 11.79 कोटी खर्च होणार – आमदार रोहित पवार
जामखेड टाईम्स वृत्तसेवा। राज्यातील जलसाठ्यांच्या दुरूस्तीसाठी हाती घेण्यात आलेल्या मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेंतर्गत कर्जत जामखेड मतदारसंघासाठी 11.19 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. आमदार रोहित पवार यांच्या माध्यमांतून हा निधी मिळाल्याने मतदारसंघातील महत्वाचा प्रश्न निकाली निघाला आहे. (sanctioned repair works of 69 reservoirs from CM Jal Samvardhan Yojana, 11.79 crore will be spent – MLA Rohit Pawar)
कर्जत जामखेड तालुक्यातील अनेक जलसाठ्यांमधून पाण्याची गळती होऊन मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याने हा अपव्यय थांबवण्यासाठी व जलसाठ्यांना पुनर्स्थापित करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्यानंतर मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या सहकार्याने कर्जत जामखेड तालुक्यात राबविण्यात येणार आहे.
कर्जत – जामखेड मतदारसंघातील अनेक बंधारे नादुरुस्त होते. यातून पाण्याचा मोठा अपव्यय होत होता. उन्हाळ्यात पाणी टंचाईला सातत्याने सामोरे जावे लागायचे. आता बंधारे दुरूस्त झाल्यास पाणी टंचाईवर काही प्रमाणात मात करता येणार आहे.
Trending
- 11th Admission । अकरावीच्या प्रवेशासाठी अजून वाट पहावी लागणार, कारण…
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नीचा फुल टू जल्लोष
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चार दिवसांत कुठे कुठे भेटी दिल्या ? काय निर्णय घेतले ? जाणून घेऊयात एका क्लिकवर
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या 5 मोठ्या घोषणा, Chief Minister Eknath Shinde 5 big announcements
- मोठी बातमी : राज्याच्या विरोधी पक्ष नेतेपदी अजित पवार यांच्या नावाची घोषणा
- आम्ही बंड केले नसून उठाव केला आहे असे म्हणत गुलाबराव पाटलांनी धु धु धुतले
- ठाकरे हारले… शिंदे जिंकले.. सरकारने विश्वास दर्शक ठराव जिंकला
- National Lok Adalat 2022 | अहमदनगर जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये 13 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोक अदालत
- जामखेड पत्रकार संघात उभी फुट,11 जणांनी पुकारले बंड
- सरकारी कामात अडथळा, फरार आरोपींना जामखेड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- 11th Admission । अकरावीच्या प्रवेशासाठी अजून वाट पहावी लागणार, कारण…
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नीचा फुल टू जल्लोष
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चार दिवसांत कुठे कुठे भेटी दिल्या ? काय निर्णय घेतले ? जाणून घेऊयात एका क्लिकवर
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या 5 मोठ्या घोषणा, Chief Minister Eknath Shinde 5 big announcements
- मोठी बातमी : राज्याच्या विरोधी पक्ष नेतेपदी अजित पवार यांच्या नावाची घोषणा
कर्जत जामखेड तालुक्यातील सर्व बंधाऱ्यांचं सर्वेक्षण करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी कमी दर्जाचे कामे झाले आहेत ती कामे पुर्ण करण्यात येणार आहेत. कर्जत व जामखेड तालुक्यातील एकूण 69 जलसाठ्यांच्या दुरुस्तीची कामे मंजूर करण्यात आली आहेत. या कामासाठी एकूण 11 कोटी 79 लाख रुपयांच्या रकमेची तरतूद करण्यात आली आहे. या दुरुस्ती कामामुळे पाण्याचा होणारा अपव्यय तर टाळता येईलच, शिवाय पाणीसाठ्यातही वाढ होण्यास मदत होईल.
कर्जत व जामखेडच्या जनतेला जास्तीत जास्त शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी मी कायमच प्रयत्न करत असतो. ते यापुढेही करत राहील. तसेच या योजनेसाठी मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख साहेब यांनी मान्यता दिल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो.