T20 World Cup Schedule Announced: T20 वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर, भारत विरूध्द पाकिस्तान पुन्हा रंगणार सामना, पहा संपुर्ण वेळापत्रक | ICC T20 World Cup 2022: match between India and Pakistan to be played again, see full schedule

मुंबई, 21 जानेवारी : ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक (ICC T20 World Cup 2022) आयसीसीने जाहीर केले आहे. ही स्पर्धा 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर 2022 या काळात ऑस्ट्रेलियातील सात शहरांमध्ये खेळवली जाणार आहे. (T20 World Cup schedule announced, match between India and Pakistan to be played again, see full schedule)

ऑस्ट्रेलियात खेळवल्या जाणाऱ्या  ICC T20 World Cup 2022 या स्पर्धेचे दोन गट जाहीर करण्यात आले आहेत. या स्पर्धेची फायनल मेलबर्नमधील एमसीजी (MCG) ग्राऊंडवर होणार आहे.

ICC ने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 16 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर या काळात स्पर्धेची पात्रता फेरी खेळली जाईल. त्यानंतर 22 ऑक्टोबर रोजी मुख्य फेरीतील पहिला सामना विद्यमान विजेता ऑस्ट्रेलिया आणि फायनलिस्ट न्यूझीलंड (Australia vs New Zealand) यांच्यात होणार आहे.

सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर हा सामना होणार आहे. आयसीसी स्पर्धेच्या प्रथेप्रमाणे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही टीम एकाच ग्रुपमध्ये आहेत. 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्नमधील एमसीजी (MCG) स्टेडियमवर या कट्टर प्रतिस्पर्धी टीममधील (IND vs Pak) मॅचचा थरार अनुभवता येणार आहे.

मागच्या वर्षी झालेल्या वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) पाकिस्तानने भारताचा 10 विकेट्सने पराभव केला होता.आता 23 ऑक्टोबर रोजी या पराभवाचा बदला घेण्याची संधी टीम इंडियाला असेल.

टी20 वर्ल्ड कपच्या मुख्य फेरीत 12 टीम खेळणार आहेत. ग्रुप 1 मध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे. तर ग्रुप 2 मध्ये भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश या टीम आहेत. त्याचबरोबर दोन्ही ग्रुपमध्ये पात्रता फेरीतून मुख्य स्पर्धेत पात्र होणाऱ्या प्रत्येकी 2 टीम सहभागी होतील.

वर्ल्ड कप स्पर्धेतील भारताचे सामने खालील प्रमाणे

भारत विरुद्ध पाकिस्तान – 23 ऑक्टोबर, मेलबर्न

भारत विरुद्ध ग्रुप A उपविजेता – 27 ऑक्टोबर, सिडनी

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – 30 ऑक्टोबर, पर्थ

भारत विरुद्ध बांगलादेश – 2 नोव्हेंबर, अ‍ॅडलेड

भारत विरुद्ध ग्रुप B विजेता – 6 नोव्हेंबर, मेलबर्न

पहिली सेमी फायनल – 9 नोव्हेंबर, सिडनी

दुसरी सेमी फायनल – 10 नोव्हेंबर, अ‍ॅडलेड

फायनल – 13 नोव्हेंबर, मेलबर्न

ICC T20 World Cup 2022, T20 World Cup schedule announced, match between India and Pakistan to be played again, see full schedule