आरोळे हाॅस्पीटलला साडेतीन लाखांच्या औषधांची मदत

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसा निमित्त सामाजिक कार्यकर्ते निलेशभाऊ गायवळ यांच्या पुढाकारातून जामखेड शहरातील आरोळे हॉस्पिटलला सुमारे 3.5 लाख रुपयांच्या औषधांची शनिवारी मदत करण्यात आली.

आरोळे हाॅस्पीटलचे संचालक रविदादा आरोळे व डॉ शोभाताई आरोळे यांनी कोरोना काळात केलेल्या अतुलनीय सामाजिक कार्याची दखल घेऊन सामाजिक कार्यकर्ते निलेश भाऊ गायवळ (Nilesh Gaiwal) व पुणे जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे सचिव प्रा सचिन गायवळ या दोघा गायवळ बंधूंनी हाॅस्पीटलला औषध स्वरूपात मदतीचा हात दिला.

यावेळी राजेंद्र कोठारी,दत्तात्रय वारे, मधुकर राळेभात, सूर्यकांत मोरे, मंगेश आजबे, पांडूराजे भोसले, संजय काशीद, जयसिंग उगले, सुभाष आव्हाड सर, महेश निमोनकर, ॲड हर्षल डोके, किशोर गायवळ, कल्याण सुरवसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसिद्धी प्रमुख काकासाहेब कोल्हे, राहुल पवार, भोसले सर, कांतीलाल वाळुंजकर, गणेश म्हस्के, अमोल गिरमे, विजय धुमाळ सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.