Mahadev Jankar News Today : महादेव जानकारांचा शरद पवारांना दे धक्का, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा ट्विस्ट, ठरलं महादेव जानकर महायुतीतच राहणार !

Mahadev Jankar News Today : महायुतीत छोट्या पक्षांना स्थान दिले जात नसल्याचे सांगत गेल्या दिवसांपासून रासपाचे महादेव जानकार नाराज होते.त्यांनी भाजप (BJP) विरोधात मोर्चा उघडला होता.महादेव जानकर हे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सोबत जाणार हे जवळपास निश्चित असतानाच त्यांची मनधरणी करण्यात महायुतीला (Mahayuti) आले आहे.जानकर यांनी भाजप विरोधातली तलवार म्यान केली आहे.महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नवा ट्विस्ट आलाय.कारण गेल्या काही दिवसांपासून भाजपवर नाराजी दर्शवणारे रासप नेते महादेव जानकर यांनी महायुतीतच राहण्याचा निर्णय घेतला आहे.

Twist again in Maharashtra politics, Mahadev jankar give a shock to Sharad Pawar, It has been decided that Mahadev Jankar will remain in Mahayuti

महादेव जानकर यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे महादेव जानकर महाविकास आघाडीकडून लोकसभेची निवडणूक लढतील, अशी चर्चा होती.या सर्व चर्चांनंतर आता राजकारणात ट्विस्ट आणणारी घटना घडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. तसेच अजित पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील उपस्थित होते.

या बैठकीत महायुती जागावाटप याबाबत चर्चा झाली. यावेळी महादेव जानकर यांच्या पक्षाला एक जागा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.ही बैठक सुरु असताना सुनील तटकरे आणि महादेव जानकर वर्षा बंगल्याच्या बाहेर आले. यावेळी त्यांनी याबाबतची माहिती दिली. महादेव जानकर हे परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. (mahadev jankar latest news today)

राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्याशी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सविस्तर चर्चा केली. महादेव जानकर यांनी आपण महायुती सोबतच राहणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील यावेळी उपस्थित होते.(mahadev jankar latest news today)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच देशाचा खऱ्या अर्थाने विकास झालाय आणि त्यांच्या नेतृत्वातच भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल, त्यामुळे आपण मोदीजी यांच्यासोबत आहोत, असे त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीत महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला लोकसभेची एक जागा देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला. महायुतीचा प्रत्येक उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण पूर्ण शक्तिनिशी सोबत राहू, असंही महादेव जानकर यांनी यावेळी सांगितले. (mahadev jankar latest news today)

राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष महादेव जानकर यांनी महायुतीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. आज वर्षा या निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर जानकर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा खऱ्या अर्थाने विकास झाला आहे. त्यांच्याच नेतृत्वात भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल, याची खात्री असल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीसोबत राहून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे हात बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत करतानाच लोकसभा निवडणुकीत रासपला एक जागा देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि भाजप आमदार प्रसाद लाड उपस्थित होते, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. (mahadev jankar latest news today)