विविध सामाजिक उपक्रमांनी प्रा सचिनभाऊ गायवळ यांचा वाढदिवस साजरा, शिवराणा ग्रुपच्या वतीने करण्यात आले होते आयोजन

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। जामखेड शहरातील शिवराणा ग्रुपच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवत सामाजिक कार्यकर्ते प्रा सचिनभाऊ गायवळ यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रा सचिनभाऊ गायवळ यांच्या वाढदिवसानिमित्त शिवराणा ग्रुपने वंचित उपेक्षित आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि किराणा साहित्य वाटप करत मदतीचा हात दिला. शिवराणा ग्रुपच्या या विधायक उपक्रमाचे कौतुक होत आहे.

Various social activities were organized on behalf of Shivrana Group to celebrate the birthday of Prof. Sachinbhau Gaiwal

सामाजिक कार्यकर्ते प्रा सचिनभाऊ गायवळ आणि शिवराणा ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी दिव्यांग मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत वाढदिवस साजरा केला. यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच 90 किलो गहू आणि पाच किलो तेल शाळेला भेट देण्यात आले. तसेच साकत येथील गो शाळेतील 70 गायींसाठी चारा भेट देण्यात आला. तसेच मोहा परिसरातील बालगृहातील मुला मुलींना खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच 100 किलो गहू, पाच लिटर तेल, 100 वह्यांचे वाटप करण्यात आले.

Various social activities were organized on behalf of Shivrana Group to celebrate the birthday of Prof. Sachinbhau Gaiwal

यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रा सचिनभाऊ गायवळ यांनी वंचित उपेक्षित आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसमवेत आपला वाढदिवस साजरा केला. शिवराणा ग्रुपने प्रा सचिनभाऊ गायवळ यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित उपेक्षित आणि दिव्यांग बांधवांना केलेल्या मदतीमुळे सर्वांच्याच चेहर्‍यावरीन आनंद ओसांडून वाहत होता. शिवराणा ग्रुपच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

दरम्यान यावेळी भाजपा सोशल मिडीया प्रमुख उध्दव हुलगुंडे, कचरू दादा साळुंके, मायकल साळुंके, गणेश पवार, संतोष पवार, विकी साळुंके, नजीर पठाण, यश पवार, आतिश पवार, आकाश साळुंके, विनोद साळुंके, राहुल साळुंके, शुभम साळुंके, विशाल पवार आशिष साळुंके सह आदी उपस्थित होते. प्रा सचिनभाऊ गायवळ यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यासाठी शिवराणा ग्रुपने घेतलेल्या पुढाकाराबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.