Sachin Gaiwal : भाजपशी दोस्ती.. अजित पवार गटाशी सलगी.. प्रा सचिन गायवळ यांच्या मनात नेमकं चाललयं काय ?

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या विजयासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रा सचिन गायवळ (Prof. Sachin Gaiwal) व त्यांच्या टीमने जीवाचं रान केलं होतं. विधानसभा निवडणुकीनंतर (Maharashtra Assembly Elections) पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. प्रा गायवळ यांनी रोहित पवारांपासून फारकत घेतली. त्यानंतर भाजपशी (BJP) दोस्ती वाढवली होती. गायवळ हे भाजपात प्रवेश करणार असे वातावरण असतानाच गायवळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) समर्थनार्थ जामखेडमध्ये (Jamkhed) बॅनर झळकावताच जामखेडच्या राजकारणात (Jamkhed Politics) नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. प्रा सचिन गायवळ यांच्या मनात नेमकं चाललयं काय ? असा सवाल आता सर्वसामान्य जनतेत चर्चिला जाऊ लागला आहे.

Sachin Gaiwal, friendship with BJP, alliance with Ajit Pawar group.. What is really going on in Prof. Sachin Gaiwal's mind?, jamkhed news today,

2019 पासून जामखेडच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात सामाजिक कार्यकर्ते प्रा सचिन गायवळ यांचा सक्रीय वावर वाढला आहे. सामाजिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत गायवळ यांनी अल्पावधीत लोकप्रियता मिळवली. प्रा गायवळ हे जिल्हा परिषद निवडणूक लढवणार अशी चर्चा मध्यंतरी होती. परंतू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लांबणीवर पडल्या आहेत. जामखेड तालुक्यात मध्यंतरी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत गायवळ पॅटर्नची भूमिका महत्वपूर्ण ठरली. प्रा सचिन गायवळ यांच्या पुढाकाराने तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. ग्रामपंचायत निवडणुकीत रोहित पवार यांच्या गटाला धोबीपछाड देण्यात गायवळ यांनी आखलेली रणनिती यशस्वी ठरली. याचा फायदा भाजपला मोठ्या प्रमाणात झाला.

आमदार रोहित पवार यांच्या विजयासाठी जीवाचं रान करणाऱ्या प्रा सचिन गायवळ व त्यांच्या टीमने गेल्या काही महिन्यांपासून रोहित पवारांपासून फारकत घेत भाजपशी दोस्ती वाढवली होती. भाजपच्या अनेक कार्यक्रमात प्रा गायवळ यांची उपस्थित वाढली होती. नुकत्याच पार पडलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचा पॅनल विजयी व्हावा यासाठी प्रा गायवळ यांनी मोठी मेहनत घेतली. मार्केटवर भाजपने सत्ता मिळवली. भाजपच्या या विजयात प्रा गायवळ यांची भूमिका महत्वपूर्ण ठरली. एकुणच प्रा गायवळ यांचा वावर पाहत प्रा गायवळ हे लवकरच भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा गावागावात रंगली होती. भाजपच्या अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी भाजपच्या बॅनरवर प्रा गायवळ यांचा फोटो झळकावण्यास सुरुवात केली होती. यामुळे प्रा गायवळ यांचा भाजपा प्रवेश जवळपास निश्चित मानला जात होता.

Sachin Gaiwal, friendship with BJP, alliance with Ajit Pawar group.. What is really going on in Prof. Sachin Gaiwal's mind?, jamkhed news today,

परंतू अचानक प्रा सचिन गायवळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स झळकावल्याने जामखेडच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. प्रा सचिन गायवळ यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. तेव्हापासून ते राष्ट्रवादीत सक्रीय होते. रोहित पवार आमदार झाल्यापासून कानफुक्या नेत्यांनी प्रा गायवळ यांच्या विरोधात मोहिम राबवली. हलक्या कानाच्या रोहित पवारांनी गायवळ यांना बेदखल करण्यास सुरुवात केली. पण चाणाक्ष गायवळ यांनी आपली राजकीय ससेहोलपट होऊ न देता रोहित पवारांपासून फारकत घेत स्वतंत्रपणे आपला गट बांधणे सुरु ठेवले. त्यानंतर त्यांनी भाजपाशी दोस्ती केली. जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीत याचा भाजपला चांगला फायदा झाला.

Sachin Gaiwal, friendship with BJP, alliance with Ajit Pawar group.. What is really going on in Prof. Sachin Gaiwal's mind?, jamkhed news today,

बाजार समिती निवडणुकीनंतर प्रा सचिन गायवळ व भाजपचे ट्यूनिंग चांगलेच जमून आले होते. भाजपकडून आयोजित केल्या जाणाऱ्या अनेक महत्वाच्या कार्यक्रमांमध्ये प्रा सचिन गायवळ यांची उपस्थिती लक्षवेधी ठरायची. आमदार प्रा राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रा गायवळ व खर्डा भाजपच्या एका गटाने भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. एकुणच प्रा गायवळ हे लवकरच भाजपवासी होतील अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात होती. पण, प्रा सचिन गायवळ यांनी राजकीय धक्कातंत्राचा अवलंब करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन करणारे बॅनर्स जामखेडमध्ये झळकावले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता अजित पवार यांच्या ताब्यात गेला आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर त्यांच्या गटाचा चेहरा कोण असणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. राष्ट्रवादीतील अनेक नावे चर्चेत होती.अमूक नेता अजित पवार गटात जाणार, तमूक नेता अजित पवार गटात जाणार अशी चर्चा होती. पण जामखेड तालुक्यातील एकाही मोठ्या नेत्याने रोहित पवारांच्या विरोधात जाण्याचे धाडस दाखवले नाही. अपवाद होता तो संध्या सोनवणे या तरूण कार्यकर्तीचा. अजित पवार यांच्या बंडानंतर संध्या सोनवणे यांनी उघडपणे अजित पवार गटात सहभाग दाखवला होता. संध्या सोनवणे ह्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्ष आहेत.

Sachin Gaiwal, friendship with BJP, alliance with Ajit Pawar group.. What is really going on in Prof. Sachin Gaiwal's mind?, jamkhed news today,

राष्ट्रवादीत अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर अजित पवार गटाचा जामखेड तालुक्यातील चेहरा कोण हा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत होता. अजित पवार यांच्या ताब्यात राष्ट्रवादी पक्ष येताच सामाजिक कार्यकर्ते प्रा सचिन गायवळ यांनी अजित पवार यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स जामखेडमध्ये झळकावले. प्रा गायवळ हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जामखेडमधील चेहरा असू शकतात अशी चर्चा आता रंगली आहे. महायुतीत अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आहे. प्रा गायवळ यांच्या रूपाने राष्ट्रवादीला चेहरा मिळाल्यास कर्जत-जामखेड मतदारसंघातील राजकीय गणिते वेगाने तर बदलतीलच शिवाय आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल. याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला प्रा सचिन गायवळ यांच्या माध्यमांतून घवघवीत यश मिळू शकते, असा कयास राजकीय जाणकार व्यक्त करू लागले आहेत.

प्रा सचिन गायवळ हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा चेहरा बनल्यास जामखेडच्या राजकारणात महायुतीला पराभूत करणे रोहित पवार यांच्यासाठी अतिशय अवघड गोष्ट ठरेल. त्यामुळे प्रा सचिन गायवळ यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील सक्रीय सहभाग रोहित पवार यांच्यासाठी मोठी धोक्याची घंटा असणार आहे. रोहित पवार यांना विधानसभा निवडणुकीत प्रा सचिन गायवळ यांचा मोठा फटका बसणार यात तिळमात्र शंका नाही. प्रा सचिन गायवळ हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जामखेड तालुक्यातील चेहरा असू शकतात अशी चर्चा रंगली आहे. ही चर्चा खरी ठरणार का ? याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ही चर्चा खरी ठरल्यास रोहित पवारांच्या राष्ट्रवादीतील अनेक जण प्रा गायवळ यांच्या माध्यमांतून महायुतीत दाखल होऊ शकतात, अशी दाट शक्यता आता वर्तवली जाऊ लागली आहे.