मोठी बातमी : करुणा शर्मांना पुण्यात अटक

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या करुणा शर्मा यांना पुणे पोलिसांनी अटक केल्याची माहिती आता समोर येत आहे, त्यांच्यावर येरवड्यातील एका महिलेने ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता, त्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे. (Dhananjay Munde’s wife Karuna Sharma arrested)

याबाबत सविस्तर असे की, फिर्यादी व तिचा पती हे उस्मानाबादला राहत होते. नोव्हेंबर २०११ मध्ये त्यांच्या पतीची ओळख करुणा शर्मा यांच्याबरोबर झाली. त्या आपली ओळख करुणा मुंडे असे करुन दिली.

फिर्यादीचा पती वारंवार करुणा शर्मा यांच्या घरी राहू लागला. त्यानंतर फिर्यादी व त्यांचा पती पुण्यात येऊन स्थायिक झाले. पती हा शर्मा यांच्याशी वारंवार बोलत होता. १६ फेब्रुवारी २०२२ रोजी कार्यक्रमाला जायचे म्हणून पतीने फिर्यादीला भोसरी येथे नेले.

येथे करुणा शर्मा यांनी हाॅकीस्टीकचा धाक दाखवत जातीवाचक शिवीगाळ केली. फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव करत आहेत.

घटस्फोटासाठी महिलेस जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी महिलेच्या पतीसह शर्माविरुद्ध ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल होता. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करुणा शर्मा यांनी वैयक्तीक आरोप केल्यानंतर शर्मा यांचे नाव पुढे आले होते.

अजयकुमार विष्णू देडे (वय 32, रा.शिवाजीनगर, उस्मानाबाद), करुणा शर्मा (वय 43, रा.सांताक्रुज, मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत, त्यांच्याविरुद्ध जीवे मारण्याची धमकी देणे, अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार (ऍट्रोसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.