रोहित पवारांनी ( MLA Rohit Pawar) दिल्या राम शिंदेंना (Ram Shinde) शुभेच्छा !

कर्जत – जामखेड मतदारसंघाच्या राजकीय युध्दातील सकारात्मक घडामोड

एकिकडे कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघात (Karjat Jamkhed vidhansabha Matdarsangh) ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. गावोगावचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मतदारसंघात आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) गटाचे कार्यकर्ते विरूध्द माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांच्या गटाचे कार्यकर्ते अश्या थेट चुरशीच्या लढती होणार आहेत. ऐन थंडीत जामखेड (Jamkhed) तालुक्याचे राजकीय वातावरण तापलेले असतानाच ग्रामपंचायत निवडणुकीत (Grampanchayat election) पवार व शिंदे यांनी उडी घेत ऐकमेकांविरोधात आरोपांच्या फैरी झाडण्यास सुरूवात केली आहे. सध्या मतदारसंघात राजकीय जुगलबंदीचे वातावरण पेटले आहे. अश्यातच एक जानेवारी हा माजी मंत्री राम शिंदे (Ram shinde birthday) यांचा वाढदिवस असल्याने राजकीय मतभेद विसरून आमदार रोहित पवारांनी राम शिंदेंना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. आमदार रोहित पवार यांच्या या कृतीतून राजकीय हाडवैर पत्करणार्‍या गावोगावच्या राजकीय कार्यकर्त्यांनी यातून चांगला संदेश घेण्याची आवश्यकता आहे.