मोठी बातमी : ठरलं ! अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसचे बडे प्रस्थ जाणार राष्ट्रवादीत, अजित पवारांच्या बाजूने निर्णय येताच राज्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी सुरु !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची याचा फैसला केंद्रीय निवडणूक आयोगाने केला आहे. अजित पवार (Ajit Pawar) गट हाच मुळ राष्ट्रवादी पक्ष (NCP) असल्याचा फैसला निवडणूक आयोगाने दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या ताब्यात गेला आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांना नवा पक्ष आणि चिन्ह घ्यावे लागले आहे. अजित पवार यांच्या बाजूने राष्ट्रवादी पक्षाचा निर्णय येताच राज्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी सुरु झाल्या आहेत. याचा सर्वाधिक फटका काँग्रेसला (Maharashtra Congress) बसताना दिसू लागला आहे. (latest Marathi news)

Big news, decided, big Congress leader  in Ahmednagar district will go to NCP, Rajendra Nagwade, Anuradha Nagwade, big upheaval will begin in Maharashtra politics

अजित पवार हेच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, पक्ष आणि चिन्ह त्यांच्याच ताब्यात राहणार हे चित्र स्पष्ट होताच राजकीय घडामोडी वेगवान झाल्या आहेत. राष्ट्रवादीतील दोन डगरीवरील अनेक नेते आता अजित पवारांच्या तंबूत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे  काँग्रेस पक्षातील अनेक मोठे नेते अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल होणार अशी चर्चा सुरु आहे. आता ही चर्चा खरी ठरताना दिसू लागली आहे. काँग्रेसला राज्यातील पहिला मोठा धक्का अहमदनगर जिल्ह्यात बसला आहे.अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसचे बडे प्रस्थ राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. (Ahmednagar News)

अहमदनगर जिल्ह्यात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय हालचाली गतीमान झाल्या आहेत. अनेक नेते पक्षांतराच्या तयारीत आहेत. अश्यातच अहमदनगर जिल्हा काँग्रेसमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे (Ahmednagar District President of Congress Rajendra Nagwade) आणि त्यांच्या पत्नी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अनुराधाताई नागवडे (Congress Mahila Aghadi Ahmednagar District President Anuradha Rajendra Nagwade) हे आपल्या समर्थकांसह काँग्रेसला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत. (shrigonda news today)

सहकाराच्या राजकारणात नागवडे कुटूंबाचे मोठे योगदान आहे. अहमदनगर दक्षिणेतील काँग्रेसला महत्वाचा बुरुज नागवडे यांच्या रूपाने ढासळला आहे. राजेंद्र व अनुराधा नागवडे (Rajendra Nagwade) यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. नागवडे हे आपल्या समर्थकांसह अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. तशी घोषणा त्यांनी केली. नागवडे यांच्या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. नागवडे हे काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorath) यांचे विश्वासू मानले जात होते. परंतू त्यांनी आता थोरातांची साथ सोडत पवारांचे घड्याळ हातात बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी श्रीगोंदा येथे कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी आगामी राजकीय वाटचालीबाबत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी येत्या 15 दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. त्यांच्या या निर्णयास सर्व कार्यकर्त्यांनी हात उंचावून जाहीर पाठिंबा दिला.  बैठकीपूर्वी राजेंद्र नागवडे आणि अनुराधा नागवडे (Anuradha Rajendra Nagwade) यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचे राजीनामे पक्षाकडे पाठवत काँग्रेसला राम राम ठोकला.

शितल कलेक्शन जामखेड

यावेळी बोलताना राजेंद्र नागवडे म्हणाले, नागवडे कुटुंबाने दोनवेळा दुसऱ्यांना आमदार केले. आजही सामान्य माणूस नागवडे कुटुंबासोबत आहे. उमेदवारी मिळो अगर न मिळो कोणत्याही परिस्थितीत अनुराधा नागवडेंना विधानसभा निवडणुकीत उतरविण्याचा निर्णय यापूर्वीच घेतलेला आहे. काही दिवसांपूर्वी बाळासाहेब नाहाटा यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाली. त्यात नागवडे कुटुंबाला सर्वो तोपरी पाठबळ देण्याचा शब्द अजित पवारांनी दिला आहे. त्यामुळे आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या पंधरा दिवसांत अजित पवार व नेतेमंडळींच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहोत, अशी घोषणा त्यांनी यावेळी बोलताना केली.

नागवडे पुढे म्हणाले, येत्या काळात महायुती सरकारच्या माध्यमातून तालुक्यातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी सहकार्य करण्याचा शब्द अजित पवारांनी दिला आहे. महायुती सरकारच्या पाठबळावर श्रीगोंदेकरांना अभिमान वाटेल, असं काम करायचं आहे.नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस म्हणाले, नागवडे कुटुंबाने अनेकांना मोठे केले. आता कोणत्याही परिस्थितीत नागवडे कुटुंब स्वतः विधानसभा निवडणूक लढणार आहे. कार्यकत्यांनी त्यांना आमदार करण्यासाठी तयारीला लागावे, असे अवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी पार पडलेल्या बैठकीस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी आमदार बाबा सिद्दिकी यांनी दिला काँग्रेसचा राजीनामा

काँग्रेसचे मुंबईतील जेष्ठ नेते तथा माजी आमदार बाबा सिद्दिकी (Baba siddique) यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. सिद्दिकी यांनी काही दिवसांपुर्वी अजित पवार यांची भेट घेतली होती. सिद्दिकी हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. बाबा सिद्दिकी यांचे पुत्र जिशान सिद्दिकी हे काँग्रेसचे आमदार आहेत. बाबा सिद्दिकी यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मिलिंद देवरा नंतर काँग्रेसला मुंबई दुसरा मोठा धक्का बसला आहे. (Baba siddique latest news)

बाबा सिद्दिकी यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे, या पोस्टद्वारे त्यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाच्या राजीनाम्याची घोषणा केली आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मी तरुणपणात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सामील झालो आणि 48 वर्षांचा हा एक महत्त्वाचा प्रवास आहे. आज मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तत्काळ प्रभावाने राजीनामा देत आहे. मला व्यक्त करायला खूप काही आवडले असते, पण काही गोष्टी न सांगितलेल्या बर्‍या. आजवरच्या प्रवासात सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानतो, असे सिद्दिकी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहले आहे. (Former MLA Baba Siddiqui resigned from Congress)