पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाले…

मुंबई  : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांचा आज 80 वा वाढदिवस आहे. देशभरातील नेते त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांनीही शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून शरद पवार यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहे.

शरद पवार यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा, तुम्हाला चांगले निरोगी आरोग्य लाभो, दीर्घआयुषी व्हावा, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या आहे.

दरम्यान, गेली पाच दशके महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात सक्रिय असलेले शरद पवार राजकारणाचं विद्यापीठ म्हणून देशात ओळखले जातात. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतल्या यशवंतराव प्रतिष्ठान केंद्रात विशेष आयोजन करण्यात आले आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग सुरू असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी शुभेच्छा देण्यासाठी येऊ नये अशी विनंती पवार कुटुंबाकडून करण्यात आली आहे.

शरद पवार यांच्या वाढदिवसाला ऑनलाइन शुभेच्छा देण्याची व्यवस्था यंशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान केंद्रात करण्यात आली आहे. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे शरद पवार शिल्पकार आहेत, त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेसचेही दिग्गज नेते आणि मंत्री येणार असल्याची माहिती मिळत आहे.

‘‘जीवेत शरदः शतम्’ म्हणजे ‘शतायुषी व्हा’ असे आशीर्वाद हजारो वर्षांपासून या देशातील ज्येष्ठ माणसे तरुणांना देत आलेली आहेत, पण वय वर्षे 80 असलेले पवार हे ज्येष्ठ आहेत की तरुण, या संभ्रमात अनेक वर्षे देश पडलेला आहे. कारण अनेकदा तरुण आराम फर्मावत असतात तेव्हा पवार हे महाराष्ट्राच्या, देशाच्या कानाकोपऱ्यात फिरत असतात. 80 व्या वर्षपूर्तीच्या पूर्वसंध्येस पवार देशाच्या राजधानीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राष्ट्रपतींकडे शिष्टमंडळ घेऊन गेले. त्यांनी दिल्लीच्या व्यासपीठावर शेतकऱ्याचे प्रश्न मांडले.

[irp]

कोविड काळात, निसर्गचक्रीवादळात त्यांनी गावात जाऊन शेतकऱ्यांची दुःखे समजून घेतली. त्यामुळे पवार हे 80 वर्षांचे झाले यावर कोण विश्वास ठेवणार? आज शिवसेनाप्रमुख हयात असते तर त्यांनी वडीलकीच्या नात्याने ‘शरदबाबूं’ना भरभरून आशीर्वाद दिले असते, पण आज पवारांना आशीर्वाद देऊ शकतील असे ‘हात’ नाहीत व पवार झुकून नमस्कार करतील असे ‘पाय’ दिसत नाहीत.’ असं म्हणत सेनेनं बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या मैत्रीला उजाळा दिला.