मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या भूमिकेचा फडणवीसांनी घेतला समाचार !

मुंबई / प्रतिनिधी

एकत्र मिळून कांजूरच्या जागेचा वादा सोडवावा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना आवाहन केले. हवे तर त्यांना श्रेय द्यायला आम्ही तयार आहोत, असे वक्तव्य केले. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून समाचार घेतला आहे.


फडणवीस म्हणाले, कांजूरमार्ग येथे कारशेड नेल्यास किती मोठे आर्थिक नुकसान होईल हे वारंवार सांगण्यात आले आहे. शिवाय 4 वर्षांचा विलंब वेगळा कांजूरमार्ग येथे कारशेड करायचे असेल तरी सुद्धा आरेमध्ये बांधकाम करावेच लागेल हे का लपवून ठेवता? असा सवालही ठाकरे सरकारला केला आहे.