हिम्मत असेल तर होऊ द्या जनतेच्या न्यायालयात फैसला, उध्दव ठाकरेंचे बंडखोरांना अवाहन, जनतेने उठाव केला असता, पण तसं झालं नाही, कारण…

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाविकास आघाडी स्थापन करून जर आम्ही चुक केली असेल तर जनता आम्हाला घरी बसवेल, असेल हिम्मत तर आता निवडणूका घ्या, होऊन जाऊ द्या जनतेच्या दरबारात फैसला असे थेट अवाहन शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना बंडखोर आमदार आणि भाजपला दिले. ते सामनाच्या मुलाखतीत बोलत होते.

शिवसेनेत उफाळून आलेल्या बंडखोरीमुळे सेनेत उभी फुट पडली आहे. याच बंडखोरीमुळे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. शिवसेना विरुद्ध शिंदे गट हा संघर्ष अधिक चिघळला आहे. शिंदे गटाकडून पक्षावर दावा केला जात आहे. सुप्रीम कोर्टात आणि निवडणूक आयोगात हा वाद गेला आहे. अश्या सर्व परिस्थितीत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाला मुलाखत दिली. या मुलाखतीत शिवसेनाप्रमुखांनी खास आपल्या ठाकरेशैलीत विरोधकांचा समाचार घेतला.

सामानाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मुलाखत घेतली. यात बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले की, माझीच चुक झाली, हे मी फेसबुक लाईव्हमध्ये कबूल केलं, माझा गुन्हा हा आहे की, मी यांना कुटुंबातील समजून अंधविश्वास ठेवला, त्यांना ताकद दिली, ही माझी चुक झाली

त्याच ताकदीने त्यांनी उलटा वार केला, राजकारणात जन्म दिलेल्या आईला विकायला निघालेली ही औलाद आहे, पण तेवढी ताकद त्यांच्यात नाही, कारण आई ही आई असते असे सांगत निष्ठा विकली जाऊ शकतं नाही, जी विकली जाऊ शकते ती निष्ठाच नसते असंही उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना सुनावलं.

महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला ला का ? हा प्रश्न विचारला असता ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडीचा प्रयोग चुुकला असता तर जनतेने उठाव केला असता, पण तसं झालं नाही, कारण जनता आनंदी होती, सत्तेवर येताच आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं होतं, कोरोनाकाळात संपुर्ण मंत्रिमंडळ, प्रशासनाने आणि जनतेने उत्तम कार्य केलं, म्हणूनच पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये माझं नाव आलं असलं तरी ते मी माझं नाव मानत नाही, जनतेचा प्रतिनिधी म्हणून ते नाव आलं होतं,

महाविकास आघाडी स्थापन करून जर आम्ही चुक केली असेल तर जनता आम्हाला घरी बसवेल, असेल हिम्मत तर आता निवडणूका घ्या, होऊन जाऊ द्या जनतेच्या दरबारात फैसला असे थेट अवाहन शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना बंडखोर आमदार आणि भाजपला दिले.