धक्कादायक: बारावीच्या विद्यार्थीनीची जामखेडमध्ये आत्महत्या !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा

जामखेड शहरातील संताजीनगर भागात राहणारी साक्षी बाबासाहेब भालसिंग ( वय १८) या बारावीत शिकत असलेल्या विद्यार्थीनीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली आहे.या धक्कादायक घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जामखेड शहरातील संताजीनगर या भागात रहिवासी असलेले बाबासाहेब भालसिंग यांची मुलगी साक्षी ही इयत्ता बारावी मध्ये नगरमधील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. कोरोनामुळे सध्या वसतीगृह बंद असल्याने ती घरीच आॅनलाईन अभ्यास करत होती. रविवारी सकाळी साडेनऊ वाजता साक्षीने आपल्या राहत्या घरात साडीच्या साहाय्याने फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला ताबडतोब दवाखान्यात दाखल करण्यात आले पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान मयत साक्षी ही बाबासाहेब भालसिंग यांची एकुलती एक मुलगी होती. साक्षीने आत्महत्या का केली याबाबत कारण समजु शकले नाही. वैद्यकीय अधिकारी यांनी पोलीस स्टेशनला खबर दिली. पुढील तपास जामखेड पोलिस करत आहेत.