शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

दिल्ली, दि 6 एप्रिल,  जामखेड टाईम्स वृत्तसेवा । राज्यात महाविकास आघाडी विरूध्द भाजप हा संघर्ष शिगेला पोहचला आहे. दोन्हीकडून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, त्यातच ईडीच्या कारवायांनी कहर केलेला आहे. त्यातच दिल्लीतून एक महत्वाची बातमी समोर आली आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 20 ते 25 मिनिटे चर्चा झाली. या भेटीमुळे देशात राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चांना उधाण आले. दरम्यान या भेटीनंतर शरद पवार पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.