ind vs aus 5th test live score: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव गडगडला, भारताकडे इतक्या धावांची आघाडी, दुसर्या डावांत भारताची खराब सुरुवात
ind vs aus 5th test live score : बाॅर्डर गावस्कर ट्राॅफी मालिकेतील पाचव्या कसोटी सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाला जेरीस आणले. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव गडगडला. भारताने पहिल्या डावांत बनवलेल्या 185 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 181 धावांवर अटोपला. भारताकडून मोहम्मद सिराज (Siraj) व प्रसिध्दी कृष्णा यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह व नितेश कुमार रेड्डी यांनी दोन दोन विकेट्स घेतल्या.

शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा, भारताला पहिल्या डावांत 4 धावांची आघाडी मिळाली. भारताने दुसर्या डावांचा खेळ सुरु केला असता 11 षटकांत भारताने 48 धावा केल्या. परंतू यशस्वी जयस्वाल (22 धावा) व लोकेश राहूल (13 धावा) ही सलामी जोडी स्वस्तात बाद झाली मैदानावर शुभम गिल 5 तर विराट कोहली एका धारेवर नाबाद खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाकडून स्काॅट बोलॅन्ड (scott boland) याने दोन विकेट घेतल्या. 11 षटकांचा खेळ झाला तेव्हा भारताने 52 धावांची आघाडी घेतली आहे.
bumrah injury update