सुजय विखेंनी अजितदादांना दिला कानमंत्र, अजितदादांनी जोडले हात, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

शिर्डी, दि 06 एप्रिल, जामखेड टाईम्स वृत्तसेवा । राज्याच्या राजकारणात विखे आणि पवार कुटुंबामधील वाद जगजाहीर आहे.मात्र आज शिर्डीत पार पडलेल्या एका जाहीर कार्यक्रमात खासदार सुजय विखेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कानात दिलेल्या कानमंत्रावर अजितदादांनी हात जोडले, दोन्ही नेत्यांमध्ये काही मिनटे चर्चा झाली. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत शिर्डीतील पोलीस स्टेशनचा उद्घाटन सोहळा आज पार पडला.यावेळी व्यासपीठावर सुजय विखे पाटील सुद्धा हजर होते.

कार्यक्रम सुरू असताना सुजय विखे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याजवळ जात कानात काही तरी सांगितलं. विशेष म्हणजे, अजित पवार दुसऱ्या बरोबर बोलत असल्यानं सुजय विखे मागे वाट पाहत बसले आणि त्यानंतर अजित पवार यांच्याशी कानात हितगुज केलं. त्यानंतर ते आपल्या जागी जाऊन बसले.

दरम्यान कोपरगावमधील कार्यक्रमातही सुजय विखे पाटलांनी हजेरी लावली. विखे पवार यांच्यात आज जवळकी निर्माण झाल्याचे दिसून आले. आजच्या एकुणच राजकीय घडामोडींमुळे अहमदनगर जिल्ह्याचे राजकारण पुन्हा तापले आहे. अगामी काळात काही राजकीय उलथापालथी तर होणार नाहीत ना? अशी चर्चा आता जिल्ह्यात रंगली आहे.

पहा : सुजय विखे अजित दादांशी संवाद साधतानाचा video