ICC WT20 World Cup 2024 : 18 दिवस, 10 संघ, 23 सामने, आजपासून UAE मध्ये रंगणार आयसीसी वुमन्स टी 20 वर्ल्ड कप LIVE सामने
ICC WT20 World Cup 2024 : संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये आजपासून आयसीसी महिला टी 20 क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा 18 दिवसांची असणार आहे. जगभरातील 10 संघ या स्पर्धेत सहभागी असणार आहे. 20 ऑक्टोबरला फायनल सामना असणार आहे.सर्व सामने LIVE कुठे पाहता येणार ? जाणून घेऊयात.
बांगलादेशात निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेमुळे आयसीसी वुमन्स टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचे (ICC WT20 World Cup 2024) यजमानपद बांग्लादेशला गमवावं लागलं, आता ही स्पर्धा आजपासून संयुक्त अरब अमिराती (युएई) खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत 10 संघ सहभागी असणार आहे. त्यांची विभागणी ग्रुप ए व ग्रुप बी अशी करण्यात आली आहे.
ICC WT20 World Cup 2024 : भारतीय संघाचा समावेश ग्रुप ए मध्ये करण्यात आला आहे. भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानलाही या गटात समावेश आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, न्यूझीलंड हे अन्य तीन संघ या गटात असणार आहेत.ग्रुप बीमध्ये इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांग्लादेश, दक्षिण आफ्रिका, स्कॉटलंड या संघाचा समावेश असणार आहे.
आयसीसी वुमन्स टी 20 वर्ल्डकप स्पर्धेतला पहिला सामना आज 3 ऑक्टोबर रोजी बांग्लादेश विरूध्द स्कॉटलंड (Bangladesh women vs scotland women) या दोन संघात खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता हा सामना सुरू होईल. (ICC WT20 World Cup 2024)
आयसीसी वुमन्स टी 20 स्पर्धेत भारताचा पहिला सामना उद्या 4 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड विरूध्द होईल. हा सामना सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. आयसीसी वुमन्स टी 20 वर्ल्डकप स्पर्धेचे सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या डिस्ने प्लस हाॅटस्टार चॅनलवर LIVE पाहता येणार आहेत. (ICC WT20 World Cup 2024)
ICC WT20 World Cup 2024 : संघ खालीलप्रमाणे
ICC WT20 World Cup 2024 भारतीय संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार) ,स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, जेमिमा राॅड्रिग्स,यास्तिका भाटिया, पूजा वस्त्रकार, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, दयालन हेमलता,अशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील सजना संजीवन.
ICC WT20 World Cup 2024 ऑस्ट्रेलिया: ॲलिसा हिली (सी), डार्सी ब्राउन, ऍश गार्डनर, किम गर्थ, ग्रेस हॅरिस, अलाना किंग, फोबी लिचफिल्ड, ताहलिया मॅकग्रा (व्हीसी), सोफी मोलिनक्स, बेथ मूनी, एलिस पेरी, मेगन शुट, ॲनाबेल सदरलँड, टायला व्लामिंक, जॉर्जिया वेअरहॅम
ICC WT20 World Cup 2024 न्यूझीलंड: सोफी डेव्हाईन (सी), सुझी बेट्स, ईडन कार्सन, इझी गझ, मॅडी ग्रीन, ब्रुक हॅलिडे, फ्रॅन जोनास, लेह कॅस्परेक, मेली केर, जेस केर, रोझमेरी मायर, मॉली पेनफोल्ड, जॉर्जिया प्लिमर, हन्ना रोवे, ली टाहुहू
ICC WT20 World Cup 2024 पाकिस्तानः फातिमा सना (क), आलिया रियाझ, डायना बेग, गुल फिरोजा, इरम जावेद, मुनीबा अली, नशरा सुंधू, निदा दार, ओमामा सोहेल, सदफ शमास, सादिया इक्बाल (फिटनेसच्या अधीन), सिद्रा अमीन, सय्यदा आरूब शाह, तस्मिया रुबाब, तुबा हसन
ICC WT20 World Cup 2024 श्रीलंका: चमारी अथापथु (क), अनुष्का संजीवनी, हर्षिता माधवी, निलाक्षिका डी सिल्वा, इनोका रणवीरा, हसिनी परेरा, कविशा दिलहरी, सचिनी निसानसाला, विश्मी गुणरत्ने, उदेशिका प्रबोधनी, अचिनी कुलसूरिया, सुगंधी कुमारी, सुगंधी कुमारी, सुगंधी कुमारी, सुगंधी कुमारी. कांचना.
गट ब
ICC WT20 World Cup 2024 बांगलादेश: निगार सुलताना जोती (सी), नाहिदा अक्टर, मुर्शिदा खातून, शोर्ना अक्टर, रितू मोनी, शोभना मोस्तरी, राबेया, सुलताना खातून, फहिमा खातून, मारुफा अक्टर, जहांआरा आलम, दिलारा अक्तर, ताज नेहार, शठी राणी, दिशा बिस्वास
ICC WT20 World Cup 2024 इंग्लंड: हीदर नाइट (क), डॅनी व्याट-हॉज, सोफिया डंकले, नॅट सायव्हर-ब्रंट, ॲलिस कॅप्सी, एमी जोन्स (डब्ल्यूके), सोफी एक्लेस्टोन, चार्ली डीन, सारा ग्लेन, लॉरेन बेल, माइया बौचियर, लिन्से स्मिथ, फ्रेया केम्प , डॅनी गिब्सन, बेस हीथ
ICC WT20 World Cup 2024 स्कॉटलंड: कॅथरीन ब्राइस (सी), सारा ब्राइस (व्हीसी), लोर्ना जॅक-ब्राउन, अब्बी एटकेन-ड्रमंड, अबताहा मकसूद, सास्किया हॉर्ले, क्लो एबेल, प्रियनाझ चॅटर्जी, मेगन मॅकॉल, डार्सी कार्टर, आयल्सा लिस्टर, हन्ना रेनी, रेचेल स्लाटर , कॅथरीन फ्रेझर, ऑलिव्हिया बेल
ICC WT20 World Cup 2024 दक्षिण आफ्रिका: लॉरा वोल्वार्ड (क), ॲनेके बॉश, तझमिन ब्रिट्स, नादिन डी क्लर्क, ॲनेरी डेर्कसेन, मिके डी रिडर, आयंडा ह्लुबी, सिनालो जाफ्ता, मारिझान कॅप, अयाबोंगा खाका, सुने लुस, नॉनकुलुलेको म्लाबा, सेश्नी नायडू, सेशनी नायडू क्लो ट्रायॉन
ICC WT20 World Cup 2024 वेस्ट इंडिज: हेली मॅथ्यूज (क), आलिया ॲलेने, शमिलिया कोनेल, डिआंड्रा डॉटिन, शेमाइन कॅम्पबेल (vc, wk), अश्मिनी मुनिसार, Afy फ्लेचर, स्टॅफनी टेलर, चिनेल हेन्री, चेडियन नेशन, कियाना जोसेफ, झैदा जेम्स, करिश्मा रामहारक मँडी मंगरू, नेरिसा क्राफ्टन