road safety, Airbags | आठ आसनी चार चाकी गाड्यांसंबंधी नितीन गडकरींची मोठी घोषणा

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । road safety, Airbags |  चार चाकी वाहनांमध्ये प्रवास करणाऱ्यांची सुरक्षितता वाढवण्यासाठी (road safety) आठ आसनी चारचाकी (Four wheeler) वाहनांमध्ये 6 एअरबॅग (airbags) अनिवार्य करण्यात आले आहेत, केंद्र सरकारने याला मंजुरी दिली आहे अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी केली आहे.

आठ आसनी गाड्यांमध्ये 6 एअरबॅग अनिवार्य करण्याची घोषणा केल्यानंतर नितीन गडकरी यांनी ट्विट करत या निर्णयाची माहिती सार्वजनिक केली आहे.

आपल्या ट्वीटमध्ये गडकरी म्हणाले की, आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये प्रवास करणाऱ्यांची सुरक्षितता वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आता या चारचाकी वाहनांमध्ये किमान 6 एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्या आहेत. हा मसुदा GSR अधिसूचना मंजूर करण्यात आला आहे. (road safety Airbags, 6 airbags mandatory in eight seater four wheeler)

केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने (Union Ministry of Transport) याआधीच एक जुलै 2019 पासून चालक एअरबॅग आणि 01 जानेवारी 2022 पासून चालकासमोरील सह-प्रवासी एअरबॅगच्या फिटिंगची अंमलबजावणी अनिवार्य केली होती.

चारचाकी गाडींमध्ये पुढील आणि मागील दोन्ही कंपार्टमेंटमध्ये बसलेल्या प्रवाशांना टक्करांचा प्रभाव कमी करण्यासाठी, M1 वाहन श्रेणी म्हणजेच आठ आसनी वाहनामध्ये 4 अतिरिक्त एअरबॅग अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतातील वाहनांना पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित बनवण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. एअरबॅग नियमांमुळे प्रवाशांची सुरक्षितता अधिक चांगली होईल असेही गडकरी यांनी सांगितले. ( road safety Airbags, 6 airbags mandatory in eight seater four wheeler )