46000 new corona patients found in Maharashtra on Friday | महाराष्ट्रात शुक्रवारी आढळले 46 हजार नवे कोरोना रुग्ण

जामखेड टाईम्स वृत्तसेवा :  ऐन संक्रांतीच्या दिवशी महाराष्ट्रात कोरोना मोठा दणका दिला आहे. गेल्या आठवडाभरापासून राज्यात 30 ते 40 हजारांहून अधिक नवे रूग्ण रोज सापडत आहेत. दैनंदिन रुग्णसंख्या वाढल्याने राज्याच्या मात्र वाढल्या आहेत. शुक्रवारी दिवसभरात 33 हजारांहून अधिक कोरोना रूग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. (46,000 new corona patients found in Maharashtra on Friday)

राज्यात कोरोनाचा विस्फोट वाढला आहे. राज्यात वेगाने रूग्ण सापडत आहेत. राज्यात ऐन मकर संक्रांतीच्या दिवशी कोरोनाने मोठा दणका दिला. दिवसभरात तब्बल 43 हजार 211 नवे कोरोनाबाधित रूग्ण राज्यात आढळून आले आहेत. तर 33 हजार 356 रूग्ण बरे होऊन घरी परतले.

दिवसभरात 19 कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू

राज्यात शुक्रवारी दिवसभरात 19 कोरोनाबाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राज्यात 19 लाख 10 हजार 361 व्यक्ती होम क्वारंटाईन मध्ये आहेत. तर 9 हजार 286 रूग्ण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.28 टक्के आहे. तर मृत्यू दर 1.98 टक्के आहे.

राज्यात शुक्रवारी ओमिक्रॉन रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. दिवसभरात तब्बल 238 नवे रूग्ण राज्यात आढळून आले आहेत.ओमिक्रॉनने शुक्रवारी पुण्याला मोठा दणका दिला आहे. ओमिक्रॉन रूग्णांमध्ये वाढ होऊ लागल्याने  पुणेकरांच्या चिंता वाढल्या आहेत.

पुण्याला ओमिक्रॉनचा दणका

राज्यात आज आढळून आलेल्या 238 ओमिक्रॉन रूग्णांमध्ये पुणे मनपा 197, पिंपरी-चिंचवड 32, पुणे ग्रामीण 3, नवी मुंबई 3, मुंबई 2, अकोला 1 अश्या रूग्णांचा समावेश आहे. आजवर राज्यात 1605 ओमिक्रॉन रूग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 859 रूग्णांचे RTPCR अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडून देण्यात आले आहे. राज्यात सक्रीय ओमिक्रॉन रूग्णांची संख्या आता 746 इतकी आहे.

राज्यातील सक्रीय कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 2 लाख 61 हजार 658

राज्यातील सक्रीय कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता 2 लाख 61 हजार 658 इतकी झाली आहे. मुंबई,  ठाणे, पुणे , पालघर, नाशिक, रायगड , नागपुर या भागात सर्वाधिक सक्रीय कोरोनाबाधित रूग्ण आहेत. अहमदनगर जिल्ह्यातही कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून कोरोनाबाधित रूग्ण वेगाने वाढत आहेत. शुक्रवार अखेर अहमदनगर जिल्ह्यात 3121 सक्रीय कोरोनाबाधित रूग्ण आहेत.