15 ते 18 वर्षांवरील मुलांच्या लसीकरणासाठी Cowin.gov.in वर नोंदणी बंधनकारक; नोंदणीसाठी लागणार हे ओळखपत्र? जाणून घ्या सविस्तर

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सायंकाळी 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना कोरोना लस देण्याची मोठी घोषणा केली होती. आता या लसीकरणासंबंधी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. (Registration on Cowin.gov.in is mandatory for vaccination of children from 15 to 18 years; identity card required for registration?)

15 ते 18 वयोगटातील मुलाचे लसीकरण सुरू होण्यापूर्वी CoWIN App ॲपवर नोंदणी करणे आवश्यक असणार आहे. याची नोंदणी 1 जानेवारी 2022 पासुन सुरू होणार आहे अशी माहिती कोविनचे प्रमुख डाॅ आर एस शर्मा यांनी दिली.

  • केंद्र सरकारने 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणासंबंधी सोमवारी सांगितले की, लसीकरणासाठी कोविनवर नोंदणी करणे आवश्यक असेल, तसेच नोंदणी करण्यासाठी शाळेचे ओळखपत्र मुले वापरू शकतात. कारण काही मुलांकडे आधारकार्ड नसण्याची शक्यता आहे. त्यामुळे 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुले कोविन ॲपवर नोंदणीसाठी आपल्या शाळेचे ओळखपत्र वापरू शकतात अशी माहिती कोविनचे प्रमुख डाॅ आर एस शर्मा यांनी ANI वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा

 

देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधानांनी लहान मुलांचे लसीकरण आणि बुस्टर डोस यासंबंधी शनिवारी मोठी घोषणा केली. त्यामुळे आता बुस्टर डोसचाही मार्ग मोकळा झाला आहे. देशात आता कोरोना लशीचा बुस्टर डोसही दिला जाणार आहे. (PM Narendra modi live) कोरोना लढाईत देशाला सुरक्षित ठेवण्यात कोरोना योद्धा, हेल्थकेअर आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांचं खूप मोठं योगदान आहे. आजही ते कोरोना रुग्णांच्या सेवेत आपला वेळ देत आहेत.त्यामुळे खबरदारी म्हणून सरकारने त्यांना प्रिकॉशन डोस (Precaution Dose) देण्याचा निर्णय घेतला आहे.

बुस्टर डोस कधीपासुन सुरू होणार ?

10 जानेवारी, 2022 सोमवारपासून बुस्टर डोस द्यायला सुरुवात केली जाणार आहे. 60 वर्षांपेक्षा वरील नागरिक ज्यांना इतर आजार आहेत, त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रिकॉशन डोस देण्याचा पर्याय उपलब्ध असेल असंही मोदींनी सांगितलं.

लहान मुलांचे लसीकरण कधीपासून सुरू होणार ?

भारतात अत्तापर्यंत 18 वर्षांपर्यंतच्या व्यक्तीला लस घेण्यास परवानगी होती. पण, आता यापुढे 15 वर्षांपासून मुलांना लस घेता येणार आहे. पुढील महिन्यात 3 जानेवारी तारखेपासून या लसीकरणाला सुरूवात होणार आहे, अशी घोषणाही पंतप्रधानांनी यावेळी बोलताना केली होती.(Corona vaccine booster dose in india)