Bigg Boss Marathi Season 3 winner Vishal Nikam | विशाल निकम ठरला बिग बॉस मराठी सिजन तीनचा विजेता

मुंबई  : Bigg Boss Marathi 3 । बिग बॉस मराठी सीजन 3 च्या विजेत्याची रविवारी घोषणा करण्यात आली. (bigg boss marathi 3 winner vishal nikam) 100 दिवस चाललेल्या या स्पर्धेत 17 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या बिग बॉस मराठी तीनचा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. (Bigg Boss Marathi Season 3 winner Vishal Nikam)

बिग बॉस मराठी 3 चा (Bigg Boss Marathi 3) ग्रँड फिनाले उत्साहात पार पडला. या सीजनचा विजेता विशाल निकम हा ठरला आहे. जय दुधाणे आणि विशाल निकम (Jay dudhane vs Vishal Nikam) यांच्यात हा शेवटचा सामना रंगला. यामध्ये महाराष्ट्राचा रांगडा गडी विशाल निकम यांनी बाजी मारली. वीस लाख आणि ट्राफी त्याला देण्यात आली.(Bigg Boss Marathi Season 3 winner Vishal Nikam )

बिग बॉस मराठीच्या या सीजनमध्ये 17 सदस्य 100 दिवस अनेक कॅमेरांच्या नजरकैदेत राहिली. बिग बॉस मराठीच्या तिसर्‍या पर्वाचा महाअंतिम सोहळा मुंबई येथे पार पाडला.महाराष्ट्राला बिग बॉस मराठीच्या तिसर्‍या पर्वाचा विजेता मिळाला. विशाल निकम हा बिग बॉस मराठीच्या तिसर्‍या पर्वाचा विजेता तर जय दुधाणेने दुसरे स्थान पटकावले. (Bigg Boss Marathi Season 3 winner Vishal Nikam) विशाल निकमला २० लाखाचे बक्षीस आणि ट्रॉफी देण्यात आली. खेळाडूवृत्ती, टास्क जिंकण्याची त्याची जिद्द, घरातील वावर, स्पष्टवक्तेपणा यामुळे तो नेहेमीच चर्चेत राहिला.

कोण आहे विशाल निकम ? (Who is Vishal Nikam?)

10 फेब्रुवारी 1994 साली सांगली जिल्ह्यातील खानापूर या गावातील एका शेतकरी कुटुंबात विशाल निकमचा जन्म झाला. सांगलीतील विटा येथून त्याने भौतिकशास्त्र या विषयातून पदवी घेतली आहे. त्याच्या अभिनय प्रवासाबद्दल सांगायचे तर त्याने मिथुन चित्रपटातून 2018 मधे चित्रपट सृष्टीत पहिले पाऊल टाकले. (Vishal Nikam was born at Khanapur in Sangli district)

 

त्यानंतर त्याने स्टार प्रवाहवरील साता जन्माच्या गाठी या मालिकेत युवराज ही मध्यवर्ती भूमिका साकारली. ही त्याची पहिली मालिका होती. धुमस या मराठी चित्रपटातही तो झळकला आहे. तसेच विशाल निकमने स्टार प्रवाहवरील जय भवानी जय शिवाजी या ऐतीहासिक मालिकेत शिवा काशिद यांची भूमिका साकारली होती.

यानंतर त्याने स्टार प्रवाहवरील दख्खनचा राजा जोतिबा या पौराणिक मालिकेतील जोतिबाची भूमिका साकारली. यानंतर तो खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या घरा घरात पोहचला. या मालिकेने त्याला एक वेगळी ओळख दिली. या सगळ्या प्रवासात त्याला बिग बॉस मराठी तीसऱ्या पर्वात जाण्याची संधी मिळाली. (Bigg Boss Marathi Season 3 winner Vishal Nikam )