Ram Shinde : कर्जतमधील कुकडीच्या कामांसाठी नाबार्डकडून 249 कोटींचे कर्ज मंजुर – आमदार प्रा. राम शिंदे । Kukadi Prakalp

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जलसंपदा विभागाच्या राज्यातील अपुर्ण सिंचन प्रकल्प पुर्ण करणे आणि पुर्ण प्रकल्पांच्या वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करणे (Department of Water Resources) या पहिल्या टप्प्यातील कामांसाठी राज्य सरकारने नाबार्डकडून (NABARD) दिर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. या शासन निर्णयामुळे कुकडी प्रकल्पातील (kukadi prakalp) कर्जतमधील कामांसाठी नाबार्डकडून 249 कोटी रूपये उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती आमदार प्रा.राम शिंदे यांनी दिली. (Ram Shinde mla)

249 crores loan from NABARD for Kukadi Project works in Karjat - MLA Ram Shinde,  Kukadi Prakalp news, ram shinde latest news today,

आमदार प्रा राम शिंदे यांनी जलसंधारण मंत्री असताना कुकडी प्रकल्पासाठी (Kukadi Project) 4 हजार कोटी रूपयांच्या सुधारीत प्रशासकीय मान्यतेसाठी पुढाकार घेतला होता. त्यानुसार 18 सप्टेंबर 2018 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत कुकडी प्रकल्पास तत्कालीन फडणवीस सरकारने सुधारित प्रशासकीय मान्यता दिली होती. या मान्यतेमुळे कुकडी डावा कालव्याच्या लाभक्षेत्रातील अवर्षण प्रवण भागाला सिंचनाचा (Irrigation projects) फायदा झाला होता. आता आमदार प्रा राम शिंदे यांच्या पुढाकारातून कुकडी प्रकल्पासाठी पुन्हा एकदा 249 कोटी रूपये नाबार्डच्या माध्यमांतून उपलब्ध होणार आहेत. या निधीमुळे कर्जतमधील शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. आमदार प्रा.राम शिंदे यांना पाणीदार आमदार का म्हणतात याचाच प्रत्यय पुन्हा एकदा जनतेला आला आहे.

जलसंपदा विभागाच्या राज्यातील 75 अपुर्ण सिंचन प्रकल्प पुर्ण करणे आणि 155 पुर्ण प्रकल्पांच्या वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी 15 हजार कोटींपैकी पहिल्या टप्प्यातील कामांसाठी राज्य सरकारने 7 हजार 500 कोटींचे कर्ज नाबार्डकडून दिर्घ मुदतीवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यात कुकडी प्रकल्पासाठी 249 रूपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. या निधीतून कर्जत तालुक्यातील कामे मार्गी लागणार आहेत.

कृष्णा खोर्‍यातील कुकडी सिंचन प्रकल्पात कर्जत तालुक्याचा समावेश होतो. कुकडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याद्वारे कर्जत तालुक्याला शेतीसाठी पाणी पुरवठा होतो.कर्जत तालुक्यात कुकडीचे पाणी गतिमानरित्या पोहोचवण्यासाठी कुकडी कालव्याची वितरण प्रणाली मजबूत करण्याची आवश्यकता होती. त्यादृष्टीने आमदार प्रा राम शिंदे यांनी सरकारकडे पाठपुरावा हाती घेतला होता. आमदार प्रा.राम शिंदे यांनी हाती घेतलेल्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. महायुती सरकारने कुकडीच्या कामांसाठी नाबार्डकडून 249 कोटी रूपयांचे दीर्घ मुदतीचे कर्ज घेण्यास मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय जलसंपदा विभागाने जारी केला आहे.

महायुती सरकार राज्यात सत्तेवर आल्यापासून आमदार प्रा.राम शिंदे यांनी कर्जत जामखेड मतदारसंघात विविध विकास कामांसाठी करोडोंचा निधी खेचून आणण्याचा धडाका लावला आहे. मागील आठवड्यात जामखेड नगरपरिषदेच्या मलनि:स्सारण प्रकल्पासाठी 77.53 कोटींचा निधी मंजूर करून आणला होता. आता चालू आठवड्यात कर्जतमधील कुकडी कालवा वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी 249 कोटींचा निधी नाबार्डकडून उपलब्ध करण्यात यश मिळवले आहे. कर्जत जामखेड मतदारसंघात दर्जेदार पायाभूत सुविधा तसेच विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी आमदार राम शिंदे हे सातत्याने प्रयत्नशील असल्याचेच यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

कर्जतमधील कुकडीची सिंचन व्यवस्था मजबुत व्हावी, त्यातून कर्जतमधील शेतकऱ्यांच्या आयुष्यात आर्थिक समृध्दी यावी यासाठी आमदार प्रा राम शिंदे सातत्याने आग्रही असतात. आमदार शिंदे यांच्या पाठपुराव्यातून आता 249 कोटींच्या निधीतून कुकडीची कर्जतमधील वितरण प्रणाली अधिक मजबुत होणार आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. आमदार शिंदे हे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आल्यामुळे कर्जतमधील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कर्जतमधील शेतकऱ्यांना कुकडीचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावे यासाठी कुकडीची वितरण प्रणाली मजबूत करणे आवश्यक असल्याची बाब निदर्शनास येताच महायुती सरकारकडे याबाबत पाठपुरावा हाती घेतला होता. महायुती सरकारने कर्जतमधील कुकडीची वितरण प्रणाली सुधारण्यासाठी नाबार्डकडून 249 कोटींचे कर्ज उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे कर्जतच्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व महायुती सरकारचे मनापासून आभार !

आमदार प्रा.राम शिंदे, माजी मंत्री महाराष्ट्र राज्य
shital collection jamkhed