नाकातून Fabispray घ्या आणि कोरोनाला पळवून लावा, फॅबीस्प्रेची किंमत किती ? हा स्प्रे कोण वापरु शकतं ? जाणून घ्या सविस्तर

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : मागील दोन अडीच वर्षांपासून संपूर्ण जगाला कोरोना महामारीने अक्षरशः हादरवून टाकले आहे. कोरोना मुक्तीसाठी लसीकरणावर जोर दिला जात आहे. त्यातच आता कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या नेझल स्प्रेची निर्मिती करण्यात आली आहे. या स्प्रेच्या वापरास केंद्र सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे. (India’s first anti covid nasal spray lounch)

मुंबईतील औषध निर्माता कंपनी ग्लेनमार्कने ( Glenmark) कॅनडातील औषध कंपनी सॅनोटाईज (saNOtize) सोबत मिळून कोविडवर (covid 19) प्रभावी ठरणारा नेझल स्प्रे विकसीत केला आहे. या स्प्रेसच्या वापरास सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे. ग्लेनमार्क नायट्रिक ऑक्साईड नेझल स्प्रे (NONS) असं नाव असलेलं हे औषध फॅबीस्प्रे (FabiSpray) नावाने भारतात लाँच करण्यात आले आहे. हा भारतातील पहिला नेझल स्प्रे आहे.

फॅबीस्प्रेचा प्रभाव किती?

दी लँसेट रिजनल हेल्थ साऊथ ईस्ट एशिया च्या हेल्थ जर्नलमध्ये एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे, त्यात म्हटले आहे की, भारतात तिसऱ्या टप्प्यातील चाचणी दरम्यान कोरोनाच्या अतिगंभीर रुग्णांना फॅबीस्प्रे नेझल स्प्रे देण्यात आला. 24 तासानंतर रुग्णांमधील व्हायरल लोड 94 तर 48 तासानंतर विषाणूचा प्रभाव 99 टक्के कमी झाल्याचे समोर आले होते. याशिवाय देशातील कोरोना झालेल्या आणि न झालेल्यांवर सुध्दा या स्प्रेची चाचणी घेण्यात आली. 306 वयोवृद्ध लोकांवर याची चाचणी करण्यात आली. देशातील 20 रुग्णालयांमध्ये या स्प्रेची यशस्वी चाचणी करण्यात आली असे ग्लेनमार्कच्या डाॅ मोनिका टंडन यांनी सांगितले.

फॅबीस्प्रे कोणाला वापरता येणार ? त्याची किंमत किती?

ग्लेनमार्क आणि सॅनोटाईज या औषध कंपन्यांनी बनवलेला फॅबीस्प्रे या अँटी कोविडस्प्रेची विक्री पुढील आठवड्यापासून भारतात सुरु होणार. हा स्प्रे फक्त जेष्ठ कोरोना रुग्णांना वापरता येणार आहे. डाॅक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कुठल्याही मेडिकल दुकानदाराला हा स्प्रे देता येणार नाही. डाॅक्टरची चिठ्ठी असेल तरच हा स्प्रे मिळेल असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे. 25 मिलीची बाटली असलेल्या या स्प्रेची किंमत ₹850 इतकी असणार आहे असे वृत्त news18 Lokmat ने दिले आहे.

(FabiSpray launches India’s first anti-covid nose spray,Take Fabispray through the nose and beat Corona, how much does Fabispray cost? Who can use this spray Glenmark, sanotize, NONS, FabiSpray, FabiSpray Anti-Covid Nasal Spray )