Army MI17 helicopter crashes in Tamil Nadu | तामिळनाडूत लष्कराचं MI17 हेलिकॉप्टर कोसळलं

4 जण ठार झाल्याचे वृत्त; CDS बिपीन रावत रूग्णालयात दाखल

तामिळनाडू : Army MI17 Helicopter Crashes in Tamil Nadu I तामिळनाडूतील कन्नूरच्या जंगलात बुधवारी लष्कराचे एमआय-१७ हेलिकॉप्टर कोसळले. घनदाट जंगलात झालेल्या या अपघातानंतर हेलिकॉप्टरने पेट घेतला. यामध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत (Bipin Rawat) त्यांची पत्नी मधुलिका यांच्यासह लष्कराचे १४ अधिकारी होते. आतापर्यंत ४ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, जे गंभीररित्या जळालेले आहेत अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.

अपघातानंतर सुमारे एक तासानंतर, जनरल रावत यांना रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती देण्यात आली असली तरी, त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. या अपघाताची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आली आहे. जनरल बिपिन रावत यांनी ३१ डिसेंबर २०१६ ते ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत लष्करप्रमुख म्हणून काम पाहिले. त्यांनी १ जानेवारी २०२० रोजी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून पदभार स्वीकारला.

Army MI17 helicopter crashes in Tamil Nadu,
Army MI17 helicopter crashes in Tamil Nadu,

ANI या वृत्तसंस्थेनुसार, हेलिकॉप्टर सुलूर एअरबेसवरून वेलिंग्टनला जात होते. घटनास्थळी डॉक्टर, लष्कराचे अधिकारी आणि कोब्रा कमांडोचे पथक उपस्थित आहे. जळालेले मृतदेह सापडले असून त्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Army MI17 helicopter crashes in Tamil Nadu,
Army MI17 helicopter crashes in Tamil Nadu,

डोंगराच्या खाली आणखी काही मृतदेह दिसत आहेत. समोर आलेल्या अपघाताच्या व्हिज्युअल्समध्ये हेलिकॉप्टर पूर्णपणे खराब झालेले दिसत आहे आणि त्याला आग लागली आहे. गेल्या महिन्यात MI-17 देखील क्रॅश झाले होते, त्यातील सर्व १२ जण ठार झाले होते.

\या संदर्भात भारतीय वायु सेनेनं ट्वीट केलं असून यात ‘CDS जनरल बिपिन रावत यांना घेऊन जाणारे IAF Mi-17V5 हेलिकॉप्टरचा तामिळनाडूच्या कुन्नूरजवळ आज अपघात झाला. अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.’ असं म्हटलं आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सीडीएस बिपिन रावत आपल्या पत्नीसोबत उटी येथे एका कार्यक्रमात सहभागी होणार होते.आता मिळालेल्या ताज्या माहितीनुसार बिपीन रावत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे अधिकारी करत होते प्रवास

1- जनरल बिपीन रावत
2-मधुलिका रावत
3-ब्रिगेडियर एल. एस. लिडर
4-लेफ्ट. कर्नल हरजिंदर सिंग
5-नाईक गुरुसेवक सिंग
6-नायक जिंतेंद्र कुमार
7- लान्स नायक विवेक कुमार
8-लान्स नायक बी. साईतेजा
9- हवालदार सतपाल