Jitendra Awhad daughter Natasha Awhad marriage | एकच नंबर ! लेक मंत्र्याची पण लगीन साधेपणाने; जितेंद्र आव्हाडांच्या लेकीच्या लग्नाची चर्चा अवघ्या महाराष्ट्रात

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Jitendra Awhad daughter Natasha Awhad marriage | राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Minister Jitendra Awhad) यांच्या मुलीचे मंगळवारी अत्यंत साधेपणाने विवाह पार पडला. कोणताही गाजावाजा न करता जितेंद्र आव्हाड यांनी आपली कन्या नताशा हिचे लग्न रजिस्टर पध्दतीने लावून दिले. (Minister Jitendra Awhad daughter Natasha Awhad marriage)

आजकाल लग्न म्हटलं की ती मोठी खर्चिक आणि प्रतिष्ठा पणाला लावण्याची बाब झाली आहे. या सर्व गोष्टींना फाटा देत आव्हाडांनी आपल्या लाडक्या लेकीचा विवाह अतिशय साधेपणा लावून दिला. या लग्नाची संपुर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे.

चर्चेतल्या बातम्या

Jitendra Awhad daughter Natasha Awhad marriage

जितेंद्र आव्हाडांची एकुलती एक कन्या नताशा आव्हाड (Natasha Awhad) हिचा विवाह एलन पटेल (Alan Patel) यांच्याशी रजिस्टर पध्दतीने पार पडला. यावेळी दोन्ही कुटूंबातील मोजकेच पाहुणे उपस्थित होते.

Jitendra Awhad daughter Natasha Awhad marriage

लग्न म्हटलं की लेकीच्या बापावर प्रचंड दडपण असतं, लेकीच्या लग्नात कोणतीच गोष्ट कमी पडू नये यासाठी बाप कोणतीच कसर सोडत नाही. वेळप्रसंगी जमीन जुमला विकून, कर्ज काढून लाखोंचा खर्च करताना, होताना आपण आजही पाहतो.

Jitendra Awhad daughter Natasha Awhad marriage

त्यातच लेकीचा बाप जर राजकीय नेता, मंत्री, आमदार, खासदार असेल तर मग त्या लग्नाची बातच न्यारी असते. शाही पध्दतीने राजकारण्यांच्या कुटूंबात लग्न सोहळे पार पडतात परंतू या सर्व गोष्टींना फाटा देत अत्यंत साधेपणाने आपल्या लेकीचा विवाह करून देण्याचा आदर्श राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संपुर्ण देशाला घालून दिला.आव्हाडांच्या या पुरोगामी कृतीने संपुर्ण महाराष्ट्राची मने जिंकली आहेत.

Jitendra Awhad daughter Natasha Awhad marriage