म्हैसाळ सामुहिक आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, सावकारीने घेतला 9 जणांचा बळी, आठ जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात,

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Mhaisal mass suicide case । सांगलीच्या मिरज तालुक्यातील म्हैसाळमध्ये एकाच कुटुंबातील 9 जणांनी कर्जबाजारी पणाला कंटाळून विषारी द्रव्य प्राशन करुन सामुहिक आत्महत्या करण्याची खळबळजनक घटना सोमवारी उघडकीस आली होती. महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या म्हैसाळ सामुहिक आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

खाजगी सावकारकीतून ही घटना घडल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातूून समोर आले आहे.आत्महत्येपुर्वी या कुटुंबाने लिहीलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली. त्या आधारे आठ खाजगी सावकारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले आहे.

राम शिंदेंच्या विजयानंतर चोंडीत गावकऱ्यांचा विजयी जल्लोष

म्हैसाळ गावातील अंबिकानगर येथील पशुवैद्यकीय डॉक्टर माणिक येल्लाप्पा वनमोरे (49)  सह त्यांच्या कुटुंबातील आक्काताई वनमोरे (72), रेखा माणिक वनमोरे (45), प्रतिभा वनमोरे (21),आदित्य वनमोरे (15), शिक्षक पोपट येल्लाप्पा वनमोरे (52), अर्चना वनमोरे (30), संगीता वनमोरे (48), शुभम वनमोरे (28) यांनी सामुहिक आत्महत्या केली होती.

भाजपचा महाविकास आघाडीला पुन्हा एकदा दे धक्का, भाजपचे सर्व उमेदवार विजयी, काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे पराभूत !

डॉ. माणिक वनमोरे हे खासगी पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत. त्यांचे बंधू पोपट वनमोरे हे रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक होते. या दोघा भावांनी गावातील काही खासगी सावकार तसेच ओळखीतील काही जणांकडून कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाची वनमोरे कुटुंबास वेळेत परतफेड करता आली नाही. त्यामुळे सावकारांसह संबंधितांनी या कुटुंबांकडे वसुलीसाठी तगादा लावला होता. याला कंटाळून या कुटूंबाने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.

Maharashtra Vidhan Parishad election results 2022 LIVE : आखिर वो लौट आया, राम शिंदेंचा विधान परिषदेत दणदणीत विजय,

डॉ. माणिक हे गावात खासगी पशुवैद्यकीयचा व्यवसाय करतात. त्यांचा मुलगा दहावीमध्ये व मुलगी ही महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. तर पोपट वनमोरे यांची मुलगी अर्चना ही कोल्हापूर येथील बँक ऑफ इंडियाच्या बाचणी (ता. कागल, जि. कोल्हापूर) शाखेत रोखपाल म्हणून नोकरीस होत्या.

माणिक आणि पोपट या दोघांनी सावकारी पाशाला कंटाळून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पोपट यांनी त्यांची मुलगी अर्चना हिला कोल्हापूर येथून बोलावून घेतले होते. त्यानंतर दोघा भावांनी सुरुवातील कुटुंबातील इतरांना विषारी द्रव्य पाजले. त्यानंतर स्वत: विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली.

Vidhan Parishad election results 2022 LIVE | भाजप आणि काँग्रेसने आक्षेप घेतल्यामुळे मतमोजणी थांबली, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लागले लक्ष !

डॉ. माणिक हे एका गवळ्याकडून दूध घेत होते. परंतु सोमवारी ते दूध घेण्यासाठी गेले नाहीत. त्यामुळे दूध देण्यासाठी गवळी त्यांच्या घरी आला होता. परंतु उशिरापर्यंत दरवाजा वाजवून देखील डॉ. माणिक यांनी दरवाजा उघडला नाही. त्यानंतर त्यांनी ही बाब डॉ. माणिक यांच्या चुलत भावाला सांगितली. चुलत भावासह नातेवाईकांनी व शेजार्‍यांनी घराबाहेर गर्दी केली. त्यांना काही जणांनी फोन करण्याचा प्रयत्न केला. परंतु डॉ. माणिक यांच्यासह कुटुंबातील कोणीही फोन उचचला नाही.

त्यामुळे शंका आल्याने नातेवाईकांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु घराचा पुढील दरवाजा बंद होता. नातेवाईकांनी तातडीने घराच्या पाठीमागील दरवाजाकडे धाव घेतल्यानंतर दरवाजा उघडला दिसला. नातेवाईकांनी घरात प्रवेश केल्यानंतर डॉ. माणिक यांच्यासह कुटुंबातील सहाजण निचपीच पडल्याचे निदर्शनास आले.

Vidhan Parishad election results LIVE Updates 2022 | काँग्रेसकडून भाजपच्या दोन आमदारांच्या मतांवर आक्षेप, निवडणुक निर्णय अधिकाऱ्याने आक्षेप फेटाळला, आता पुढे काय ?

याबाबत माहिती देण्यासाठी काही जणांनी पोपट यांना देखील फोन केला. परंतु त्यांनी देखील फोन न उचलल्याने याबाबत तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी पोपट यांच्या घरी पाहणी केली असता पोपट वनमोरे त्यांची पत्नी संगीता व मुलगी अर्चना यांचे मृतदेह आढळले.

धक्कादायक : वीज खंडीत केली जाणार.. मॅसेजवर विश्‍वास ठेवला.. दीड लाखाला चुना लागला

पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी डॉ. माणिक आणि पोपट यांच्या खिशात वेगवेगळी चिठ्ठी सापडली. यामध्ये काही खासगी सावकारांची नावे निष्पन्न झाली असून पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतले आहे.

खळबळजनक  : एकाच कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या, सांगली जिल्ह्यातील घटनेने महाराष्ट्र हादरला !

आठ सावकार ताब्यात

डॉ. माणिक आणि पोपट यांच्याकडे मिळालेल्या चिठ्ठीमध्ये आठ जणांची नावे निष्पन्न होताच स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक अजय सिंदकर, सहायक निरीक्षक प्रशांत निशानदार यांचे एक पथक रवाना झाले. पथकाने म्हैसाळ, वड्डी, बेडग आणि सांगली येथील आठ सावकारांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

खळबळजनक : अहमदनगर जिल्ह्यात आठ गावठी पिस्तूल, 10 जिवंंत काडतुसांसह तिघांना बेड्या, एलसीबीची धडक कारवाई