भाजपचा महाविकास आघाडीला पुन्हा एकदा दे धक्का, भाजपचे सर्व उमेदवार विजयी, काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे पराभूत !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : विधान परिषदेच्या निवडणूकीत पुन्हा एकदा राज्यसभा निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती झाली, सलग दुसऱ्यांदा महाविकास आघाडीला दे धक्का देत भाजपने दणदणीत विजय संपादन केला. महाविकास आघाडीच्या एकजुटीला राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीच्यानिमित्ताने सुरुंग लावण्यात भाजप यशस्वी झाली आहे. या निवडणुकीत काँग्रेसचा लाजिरवाणा पराभव झाला. दहाव्या जागेसाठी काँग्रेसचे भाई जगताप विजयी झाले.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज निवडणूक झाली. यामध्ये भाजपकडून राम शिंदे प्रवीण दरेकर प्रसाद लाड श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे तर शिवसेनेकडून सचिन आहिर, आमश्या पाडवी, राष्ट्रवादीकडून रामराजे निंबाळकर, एकनाथ खडसे तर काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हांडोरे असे अकरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

आज सायंकाळी हाती आलेल्या निकालानुसार भाजपने पाच, राष्ट्रवादीने दोन, शिवसेनेने दोन, काँग्रेसने 1 जागांवर विजय मिळवला. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला पुन्हा एकदा दे धक्का देण्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस हे यशस्वी झाल्याचे या निकालातून स्पष्ट होत आहे.

Maharashtra Vidhan Parishad election results 2022 LIVE : आखिर वो लौट आया, राम शिंदेंचा विधान परिषदेत दणदणीत विजय,

महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील अतिरिक्त मतांचा फायदा काँग्रेसच्या भाई जगताप यांना होईल, असं वाटत होतं. मात्र भाजपने दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीच्या मतांच्या जोरावर पुन्हा एकदा आपला उमेदवार निवडून आणला.

विधान परिषदेच्या 10 जागांसाठी एकूण 11 उमेदवार रिंगणात उभे होते. आज सकाळपासून राज्यातील 285 आमदारांनी मतदानाला हजेरी लावली. विधान परिषदेचं मतदान गुप्त पद्धतीनं होत असल्यामुळे शेवटपर्यंत निकालाची उत्सुकता ताणली गेली.शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मदतीनेही काँग्रेसला आपला उमेदवार निवडून आणता आला नाही, त्यामुळे आता महाराष्ट्र काँग्रेसच्या भवितव्याबाबत निश्चितच प्रश्न उभा राहणार आहे.

खळबळजनक  : एकाच कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या, सांगली जिल्ह्यातील घटनेने महाराष्ट्र हादरला !

विधान परिषदेच्या आजच्या निवडणुकीत 11 उमेदवार उभे होते. त्यापैकी 10 उमेदवार विजयी झाले असून भाजपच्या प्रसाद लाड यांचा पराभव झाला. उमेदवारांना मिळालेली मते अशी-

भाजपा

प्रवीण दरेकर- विजयी 29 मतं

राम शिंदे- विजयी 30 मतं

श्रीकांत भारतीय- विजयी 30 मतं

उमा खापरे- विजयी 27 मतं

प्रसाद लाड- विजयी 26 मतं

काँग्रेस

चंद्रकांत हंडोरे- पराभूत

भाई जगताप- विजयी 26 मतं

शिवसेना

सचिन अहिर- विजयी 26 मतं

आमसा पाडवी- विजयी 26 मतं

राष्ट्रवादी काँग्रेस

एकनाथ खडसे- विजयी 27 मतं

रामराजे नाईक निंबाळकर- विजयी 26 मतं

विजयासाठी किती मतांचा कोटा आवश्यक?

महाराष्ट्रातील आमदारांचं संख्याबळ एकूण 285 एवढं आहे. विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराला किमान 26 मतांच्या कोट्याची गरज होती. मात्र भाजप आणि काँग्रेसने आपापल्या आमदारांच्या संख्याबळापेक्षा एक-एक उमेदवार जास्त उभा केल्यामुळे या निवडणुकीत जास्त रंगत आली.

भाजपकडे 55 मतं आणि 7 अपक्षांचा पाठिंबा होता. त्यानुसार भाजपचे पाच उमेदवार निवडून येण्यासाठी 10 अतिरिक्त मतांची गरज होती. तर काँग्रेसकडे 44 मतं होती. दोन उमेदवार निवडून येण्यासाठी काँग्रेसला आणखी 8 मतांची गरज होती. तर शिवसेना आणि राष्ट्रवादीने आपापल्या मतांच्या कोट्यानुसार दोन-दोन उमेदवार दिले. त्यामुळे भाजपचे प्रसाद लाड आणि भाई जगताप या दोघांमध्ये खरी लढत झाली. अखेरीस भाजपच्या प्रसाद लाड यांचा विजय झाला.

कुणाकडे किती संख्याबळ, कसे जिंकले?

शिवसेनेचे एकूण 55 मतं असून 7 अपक्षांचा पाठींबाही होता. त्यामुळे शिवसेनेचे दोन उमेदवार सहज विजयी झाले. उर्वरीत पहिल्या पसंतीची अतिरिक्त मतं आणि दुसऱ्या पसंतीची मतं काँग्रेसकडे वळवण्यात आली.

राष्ट्रवादीकडे 51 संख्याबळ होतं. दोन उमेदवार विजयी होण्यासाठी 26 च्या कोट्यानुसार एका मताची गरज होती. त्यातही एक मत बाद झालं. मात्र अनेक लहान पक्ष आणि अपक्षांनी राष्ट्रवादीला साथ दिली आणि राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार विजयी झाले.

काँग्रेसकडे 44 मतं होती. दोन उमेदवार निवडून येण्यासाठी त्यांना 8 मतांची गरज होती. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडील अतिरिक्त मतांची गरज होती. मात्र ऐनवेळी भाजपने मतांची जुळवाजुळव झाल्याने काँग्रेसचे दुसरे उमेदवार भाई जगताप यांचा पराभव झाला.

भाजपने 106 संख्याबळावर पाच उमेदवार रिंगणात उभे केले. त्यातही एक मत बाद झालं. तसेच अपक्षांचाही पाठिंबा होता. संख्याबळानुसार पाचवा उमेदवार निवडून येण्यासाठी भाजपला 17 ज्यादा मतांची गरज होती. राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतांची जुळवाजुळव करून भाजपने पाचवाही उमेदवार दणदणीतपणे विजयी केला.