राम शिंदेंच्या विजयानंतर चोंडीत गावकऱ्यांचा विजयी जल्लोष

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : विधान परिषद निवडणुकीमध्ये माजी मंत्री राम शिंदे यांचा दणदणीत विजय होताच शिंदे यांच्या जन्मभूमी चौंडीतील गावकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. (After the victory of Ram Shinde, the villagers of Chondi celebrated their victory)

माजी मंत्री राम शिंदे हे भाजप कडून विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवार होते. आज विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदान झाले आणि त्यानंतर रात्री उशिरा निकाल समोर आला. या निकालात सर्वाधिक मतांनी माजी मंत्री राम शिंदे हे विजयी झाले. शिंदे यांच्या विजयाची बातमी जामखेड तालुक्यात पसरताच शिंदे समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत विजयोत्सव साजरा केला.

Maharashtra Vidhan Parishad election results 2022 LIVE : आखिर वो लौट आया, राम शिंदेंचा विधान परिषदेत दणदणीत विजय,

दरम्यान राम शिंदे यांची जन्मभूमी असलेल्या चोंडीमध्येही राम शिंदे यांच्या विजयाचा उत्सव गावकऱ्यांनी साजरा केला. सायंकाळपासूनच राम शिंदे यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी आणि गावकर्‍यांनी गर्दी केली होती. राम शिंदे यांच्या विजयाची घोषणा होताच गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी ढोल-ताशांच्या गजरात गावकर्‍यांनी विजयोत्सव साजरा केला.

खळबळजनक  : एकाच कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या, सांगली जिल्ह्यातील घटनेने महाराष्ट्र हादरला !

राम शिंदे यांच्या विजयाची बातमी समजतात राम शिंदे यांच्या मातोश्री भामाबाई शिंदे यांच्यासमवेत गावकऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी राम शिंदे यांच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा केला. आपला मुलगा पुन्हा आमदार झाला याचा आनंद भामाबाई शिंदे यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.

यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस तथा प्रसिद्धीप्रमुख सचिन पोटरे, माजी उपसरपंच वर्षाराणी उबाळे, अनिल उबाळे, अजिंक्य शिंदे, दादा सोनवणे, राजू टकले, राजू उबाळे, शंकर शिंदे, सुदर्शन भोंडवे,गोकुळ सामसे, भारत माने, विजय भांडवलकर, बाबासाहेब भांडवलकर, सुनील मधुकर उबाळे, बाबासाहेब सोनवणे, उषाबाई भांडवलकर,

कर्जत जामखेडला मिळणार दुसरा आमदार, उत्सुकता शिगेला, विधानपरिषदेचे मतदान सुरू !

शुभांगी उबाळे, जालिंदर उबाळे, खंडू शिंदे, किरण मोरे,नितीन मोरे, भाग्यश्री कोकाटे, मीना उबाळे,अक्षय उबाळे, रितेश मोरे, तुषार उबाळे ,शिवाजी भांड, शिवाजी उबाळे, शुभम मोरे,गणेश उबाळे, सुदर्शन शिंदे, सुजित शिंदे, साजन राजगुरू, अशोक राजगुरू, दिलीप जगदाळे, माजी सरपंच आभिमान सोनवणे, सागर मांगले, भारत शिंदे,विनोद सोनवणे, दत्ता उबाळे सह आदी यावेळी उपस्थित होते