महाराष्ट्रात राजकीय भूकंप, शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे 11 समर्थक आमदारांसह गुजरातला, शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर?

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बोलवलेल्या शिवसेनेच्या बैठकी आधीच महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. मंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या 11 समर्थक आमदारांसह सुरतमध्ये पोहोचले आहेत. शिवसेनेतील या घडामोडींमुळे शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

समोर येत असलेल्या माहितीनुसार मंत्री एकनाथ शिंदे हे सुरतमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ते थांबले असून,
गुजरात भाजपचे अध्यक्ष सी आर पाटील यांच्या ते संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शिवसेनेचे टेन्शन वाढले आहे.

राज्यसभेनंतर विधान परिषद निवडणुकीतही पाच उमेदवार निवडून आणत महाविकास आघाडीला देवेंद्र फडणवीस यांच्या चाणक्यनितीने हादरा दिला. आघाडीची तब्बल 21 मते फुटली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांची तातडीची बैठक वर्षा निवासस्थानी बोलावली आहे.

आज दुपारी बारा वाजता ही बैठक होणार असून या बैठकीत फुटलेल्या मतांवर चर्चा आणि चिंतन केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शिंदे हे बैठकीला जाणार का? याबाबत उत्सुकता आहे.

एकनाथ शिंदे हे गुजरातला गेले आहेत. सुरतमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ते थांबले असून, गुजरात भाजपचे अध्यक्ष सी आर पाटील यांच्या ते संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे.

गेले काही वर्ष नाराज असलेले शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि त्याच्या गटाचे आमदार विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर नॉट रिचेबल झाले आहेत. काल सायंकाळपासूनच ते गायब आहेत. आमदार संपर्काच्या बाहेर असल्याची कुणकुण लागताच वर्षा बंगल्यावर सर्व आमदारांची बैठक बोलावण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

सोमवारी पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेने आपले दोन्ही उमेदवार विजयी झाले. मात्र, या निवडणुकीत काँग्रेससोबत शिवसेनेचेही मते फुटली असल्याची चर्चा सुरू आहे. आता फुटलेल्या मतांवरून आता शिवसेनेतच फूट पडतेय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

ठाकरे आणि शिंदेमध्ये झाला होता वाद

शिवसेनेच्या 56 व्या वर्धापनदिनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये खडाजंगी झाली होती. त्या दिवसांपासून एकनाथ शिंदे नाराज होते. वर्धापनदिनी नाव असतानाही त्यानी मार्गदर्शन करण्यास नकार दिला होता. शिंदे गटांमध्ये यावरून दोन दिवस खदखद सुरू होती. मात्र विधान परिषदेच्या निवडणूक पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांचे निकटवर्तीय बारा आमदार गायब झाले आहेत. शिंदे यांना शिवसेनेकडून सातत्याने संपर्क साधला जातो आहे. परंतु, शिंदे यांचे मोबाईल बंद असल्याने शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे.

बातमी अपडेट होत आहे…