Karjat Nagar Panchayat Election | कर्जत नगरपंचायत निवडणुक; चार प्रभागांसाठी खुल्या प्रवर्गातून आरक्षण जाहीर !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Karjat Nagar Panchayat Election । कर्जत नगरपंचायतीच्या ओबीसी आरक्षणामुळे स्थगित असणाऱ्या चार प्रभागासाठी गुरुवारी पुन्हा नव्याने आरक्षण काढण्यात आले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अजित थोरबोले यांच्या उपस्थितीमध्ये आरक्षण सोडत संपन्न झाली आहे.

कर्जत नगरपंचायतीच्या १२ जागांसाठी मंगळवारी 21 डिसेंबर रोजी सरासरी ८०% मतदान पार पडले आहे. ओबीसी आरक्षणामुळे सुप्रीम कोर्टाच्या नुतन आदेशानुसार चार प्रभागाच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या.

ओबीसींसाठी राखीव असणाऱ्या जागी खुल्या प्रवर्गातून निवडणुका घेण्यात यावे असे आदेश आले. त्यानुसार गुरुवारी सकाळी ११ वाजता कर्जत नगरपंचायतीच्या चार प्रभागासाठी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अजित थोरबोले आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा नव्याने आरक्षण सोडत संपन्न झाली.

काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक सचिन घुले आणि संदीप बरबडे या दोघांचे प्रभाग महिलासाठी राखीव झाल्याने ते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चार प्रभागात होणार्‍या निवडणुकीचा कार्यक्रम खालील प्रमाणे

 

निवडणूक टप्पाटप्पा सुरु करण्याची /संपविण्याची तारीख
जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख२८/१२/२०२१ (मंगळवार)
नामनिर्देशनपत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरीता उपलब्ध असण्याचा कालावधी.२९/१२/२०२१ (बुधवार) सकाळी ११.०० ते ०३/०१/२०२२ (सोमवार) दुपारी ०२.०० पर्यंत
वरील नामनिर्देशनपत्रे स्विकारण्याचा कालावधी२९/१२/२०२१ (बुधवार) ते ०३/०१/२०२२ (सोमवार) (सकाळी ११.०० ते दुपारी ०३.०० पर्यंत) दि.०१/०१/२०२२ शनिवार व दि.०२/०१/२०२२ रविवार या सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात येणार नाहीत.
नामनिर्देशनपत्राची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक०४/०१/२०२२ (मंगळवार) सकाळी ११.०० वाजल्यापासुन
नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक ५ अ अपील नसेल तेथे अपील असल्यास (1) वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद झाल्याच्या तारखेपासून तीन दिवसांच्या आत, जिल्हा न्यायशाकडे अपिल करता येईल. (ii) निवडणूक निर्णय अधिकारी यानी अपिलाचा निर्णय लवकरात ६ लवकर प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत,१०/०१/२०२२ (सोमवार) दुपारी ०३.०० वाजेपर्यंत अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी,
निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक उमेदवारी मागे घेण्यासाठीच्या शेवटच्या दिवसानंतरच्या लगतच्या दिवशी
आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक१८/०१/२०२२ (मंगळवार) सकाळी ७.३० पासून ते सायंकाळी ५.३० पर्यंत
मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक१९/०१/२०२२ (बुधवार) सकाळी १०.०० वाजल्यापासून
महाराष्ट्र शासन राजपत्रात निकाल प्रसिध्द करणेकलम १९ मधील तरतुदीनुसार

जाहीर झालेले आरक्षण खालील प्रमाणे

प्रभागाचे नाव जाहिर आरक्षण
प्रभाग क्रमांक १ (गायकरवाडी) सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक ३ (ढेरेमळा) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ५ (पोस्ट ऑफिस परिसर) सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक ७ (बुवासाहेब नगर)सर्वसाधारण