Karjat Nagar Panchayat Results | कर्जत नगरपंचायतवर कब्जा कुणाचा ? धक्कादायक निकाल ? थोड्याच वेळात फैसला !
जामखेड टाईम्स वृत्तसेवा | Karjat Nagar Panchayat Results | अतिशय चुरशीच्या वातावरणात पार पडलेल्या कर्जत नगरपंचायत निवडणूकीच्या 17 जागांचा फैसला आज होणार आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता आहे. यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. (Who owns Karjat Nagar Panchayat? The decision will be made in a short time, the possibility of shocking results?)
राज्यात गाजलेल्या कर्जत नगरपंचायत निवडणुकीत आमदार रोहित पवार व माजी मंत्री राम शिंदे यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही नेते प्रथमच निवडणुकीला सामोरे गेले. आरोप प्रत्यारोपांच्या फैरीने कर्जतची निवडणुक राज्यात गाजली.
- कर्जत-जामखेडला मिळणार ३ आमदार; कोण आहेत सुनील कर्जतकर? जाणून घेऊयात त्यांचा राजकीय प्रवास
- धक्कादायक! पोटच्या मुलाने केली बापाची हत्या; जामखेड तालुक्यातील अरणगाव येथील खळबळजनक घटना
- मुंबई: चोंडीच्या नियोजनबद्ध विकासातून पर्यटनाला मिळणार चालना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- Manohar Mama Bhosale Arrest: पूजेच्या नावाखाली व्यावसायिकाची लूट; भोंदू मनोहर भोसलेचा खेळ खल्लास, कुर्डुवाडी पोलिसांची मोठी कारवाई
- मोठी बातमी : पाणीटंचाई व उष्माघाताबाबत तातडीने उपाययोजना हाती घ्या, जिल्हाधिकाऱ्यांचे कर्जत-जामखेडच्या प्रशासनाला निर्देश
17 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार ? कोण पराभूत होणार ? याचा फैसला अवघ्या काही तासांत होणार आहे. या निवडणुकीत धक्कादायक निकाल हाती येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आमदार रोहित पवार व माजी मंत्री राम शिंदे या दोन्ही नेत्यांनी नगरपंचायत आमच्याच ताब्यात येणार असे दावे केले आहेत. कर्जत नगरपंचायतचा निकाल दोन्ही नेत्यांच्या अगामी राजकीय भविष्याचा फैसला करणारा ठरणार आहे. कर्जतच्या निकालातून कोणाची ताकद घटली ? कोणाची वाढली ? हेही स्पष्ट होणार आहे.