कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी प्रशासन आले ॲक्शन मोडवर

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी तालुका प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. कारवाईचा पहिला बडगा दुकानांवर उगारला जाणार आहे. ज्या दुकानातील कामगारांचे लसीकरण होणार नाही त्या दुकानांविरोधात कारवाई करण्याचा इशारा तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिला आहे.

देशात ओमिक्रॉन या कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता उपाययोजना वेगाने राबवल्या जात आहेत. यासाठी लसीकरणावर सर्वाधिक भर दिला जात आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव कमी करण्यासाठी कोविशिल्ड आणि कोव्हक्सीन या लसींशिवाय पर्याय नसल्यानेच शासनस्तरावरून लसीकरण वेगाने हाती घेण्यात आले आहे.

भारतात कोरोनाची तिसरी लाट सक्रीय होऊ शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे. भविष्यातील हानी टाळण्यासाठी ज्या नागरिकांनी अजूनही कोरोनाच्या लसी घेतल्या नाहीत त्यानी तातडीने लसीकरण करून घ्यावे असे अवाहन तालुका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सर्व लोकांनी लसीकरण करून घ्यावे म्हणून शासनाचे सर्व विभाग प्रयत्न करत आहे, लसीचा पुरवठा सुद्धा पूर्ण आहे परंतु आपल्यामधील गैरसमजामुळे उर्वरित लोक लस घेण्यास नकार देत आहे. लस घेतल्याने कोणताही दुष्परिणाम होत नाही त्यामुळे आपण सर्वांनी निसंकोचपणे लस घेणे गरजेचे आहे. आरोग्य विभागाकडे गावातील लस न घेतलेल्या लोकांची यादी उपलब्ध आहे.

त्याप्रमणे आपण सर्वांनी प्रशासनास लस घेऊन सहकार्य करावे. तसेच सर्व आस्थापाना यांना आवाहन करण्यात येते कि, आपण आपल्या दुकानातील सर्व कामगार यांचे लसीकरण दिनांक २६/१२/२०२१ पर्यंत पूर्ण करून घ्यावे. दिनांक २६/१२/२०२१ नंतर सर्व अस्थापना प्रशासनाकडून तपासणी केल्या जाणार असून जर कुठे लस न घेतलेले कामगार आढळल्यास संबंधित आस्थापना वर कार्यवाही केली जाईल याची सर्व आस्थापनाधारक यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी असा इशारा तहसीलदार योगेश चंद्रे दिला आहे.

आस्थापना मध्ये येणाऱ्या लोकांनी मास्क लावणे बांधण्कारक करावे, त्यासाठी दुकानाच्या बाहेर “NO MASK NO ENTRY” असे बोर्ड लावावे.विना मास्क व्यक्ती दुकानामध्ये आढळल्यास संबंधित व्यक्ती तसेच आस्थापना यांचेकडून दंड वसूल केला जाईल असाही इशारा देण्यात आला.

कोविड आजारावर सध्या प्रभावी उपाय म्हणून लसीकरण करणे आणि मास्क व sanitiser चा वापर करणे गरजेचे आहेत. त्यामुळे सर्वप्रथम सर्व उर्वरित नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. सार्वजनिक ठिकाणी मास्क चा प्रभावी वापर करावा .आत्तापर्यंत कोविड आजारावर मात करण्यासाठी जामखेड मधील नागरिकांनी चांगल्या प्रकारे साथ दिली आहे पुढेही देत राहावी. कोविड चे नियम न पाळणाऱ्या नागरिकांना कार्यवाहीस सामोरे जावे लागेल याची सर्व नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे अवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.