Avinash Dhanave Murder Case News : अविनाश धनवे हत्याकांड प्रकरणात समोर आली धक्कादायक माहिती,ज्याला भावासारखं जपलं तोच बनला अविनाश धनवेचा कर्दनकाळ!

Avinash Dhanave Murder Case News | 17 मार्च 2024 :  पुण्याच्या आळंदी भागातील सराईत गुन्हेगार अविनाश धनवे याची हत्या करण्यात आली आहे.(Avinash Dhanave) पंढरपूरला जात असताना अविनाश धनवे याची इंदापूर (Indapur) येथील एका हाॅटेलमध्ये हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना शनिवारी रात्री 8 वाजता घडली. या हत्याकांड murder प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले.थरकाप उडवणारे हे व्हिडीओ सोशल मीडियावर रविवारी दिवसभर प्रचंड व्हायरल झाले.अविनाश धनवे हत्याकांड प्रकरणात आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Avinash Dhanave Pune News)

Avinash Dhanave Murder Case News, Shocking information has come out in Avinash Dhanave murder case, Avinash Dhanve was killed by friend, indapur Aalandi Pune latest news today,

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर बाह्यवळणावर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये अविनाश बाळू धनवे आळंदी पुणे (Avinash Balu Dhanave Aalandi Pune) हा आपल्या मित्रांसह जेवणासाठी बसला होता.जेवण येण्याआधी हाॅटेलमध्ये काही युवक घुसले त्यांनी अविनाश धनवे (avinash Dhanave) याची गोळ्या घालून त्यानंतर कोयत्याने वार करून हत्या (murder) केली. या हत्याकांडाच्या घटनेने मोठी खळबळ उडवून दिली आहे. (Avinash dhanave murder news)

आळंदी येथील सराईत गुन्हेगार अविनाश धनवे याची इंदापूरात निर्घृणपणे हत्या करण्यात आली. संपुर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या या घटनेचा पोलिसांनी वेगाने तपास हाती घेतला आहे.अविनाश धनवे हत्याकांड प्रकरणात 11 आरोपी निष्पन्न झाले आहेत. लवकरच हे आरोपी गजाआड होतील असा विश्वास पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी व्यक्त केला आहे. (Avinash dhanave latest news today)

मयत अविनाश धनवे हा मोक्कातील आरोपी होता, त्याच्यावर हल्ला करणारे सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. अविनाशची हत्या त्याच्या अत्यंत जवळच्या मित्राने केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. ज्याला भावासारखं जपलं त्याच मित्राने आपल्या साथीदारांसह अविनाश धनवेचा गेम वाजवला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (Avinash dhanave latest news)

धनवे हा पंढरपूरला जात असताना तो इंदापूर येथील एका हाॅटेलमध्ये त्याच्या तिन मित्रांसह जेवायला बसला होता. त्याचवेळी त्याची गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करत हत्या करण्यात आली.अविनाश धनवेच्या मित्राशी संगनमत करून हल्लेखोरांनी अविनाश धनवे याची हत्या केली असे पोलिस तपासात समोर आले आहे.अविनाश धनवेच्या ज्या मित्राने हल्लेखोरांना सर्व माहिती पुरवली त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर येत आहे. (Avinash dhanave murder case news today)

अविनाश धनवे हत्याकांडातील सर्व आरोपी हे लँड डिलिंगशी संबंधित आहेत. जमीन खरेदी विक्री तसेच बेकायदा ताबा मिळवणे अशा व्यवहारात त्यांच्यावर आळंदी, चाकण आणि चऱ्होली परिसरात अनेक गुन्हे दाखल आहेत.लँड माफियांच्या टोळी युद्धातूनच ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचं सीसीटीव्ही राज्यभरात व्हायरल झालं आहे, त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांनी या गुन्ह्याची गंभीर दखल घेतली आहे. आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी वेगवेगळी पथके कार्यरत केली आहेत. लवकरच आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील असे पोलिसांनी सांगितले. (Avinash dhanave murder case latest news in marathi)

शनिवारी रात्री इंदापूरात नेमकं काय घडलं ?

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील (Pune Solapur Highway) इंदापूर बाह्यवळणावर हॉटेल जगदंबा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट (Hotel Jagdamba Indapur) आहे. या ठिकाणी जेवण करण्यासाठी अविनाश धनवे यांच्यासह चार युवक बसले होते. त्यांनी जेवणाची ऑर्डर दिली. त्यानंतर ते जेवण येण्याची वाट पाहू लागले. त्यांच्या गप्पाही रंगल्या होत्या. परंतु पुढे काय घडणार आहे, याची चौघांना कल्पना नव्हती. चौघे जण जेवणासाठी बसलेले असताना दोन युवक हॉटेलमध्ये घुसले. त्यांनी थैलीत आणलेली पिस्तूल काढले आणि चौघांपैकी अविनाशवर गोळीबार सुरु केला. त्यानंतर आणखी काय युवक आले. त्यांनी अविनाशवर कोयत्याने वार सुरु केले. त्यानंतर काही सेंकदात सर्व जण हत्या करुन फरार झाले. (Avinash dhanave murder case)

यावेळी अविनाशसोबत असणारे तिघे प्रचंड घाबरले. त्यांनी पळ काढला. ही सर्व घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे.शनिवारी सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. दरम्यान या हल्लाची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरली. त्यानंतर हॉटेलमध्ये मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे.मयत अविनाश धनवे हा गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचा आहे. गुन्हेगारीच्या वादातूनच त्याची हत्या झाली असण्याची शक्यता आहे. (Avinash dhanave pune news)

कोण आहे अविनाश धनवे ?

अविनाश धनवे हा आळंदीमधील कोयता गॅंगचा म्होरक्या होता. गेली पंधरा वर्षापासून तो गुन्हेगारी क्षेत्रात होता. त्याच्यावर आळंदी आणि भोसरी पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहे. तो येरवडा कारागृहात असताना त्या ठिकाणी त्याची काही कैद्यांसोबत त्याची हाणामारी झाली होती. तो मोक्कातील आरोपी आहे. महिनाभरापुर्वीच तो जेलमधून बाहेर आला होता. (Avinash Dhanave murder news pune indapur)