महाराष्ट्रातील शाळांमध्ये राष्ट्रगीत, प्रार्थनेसह गायले जाणार नवीन राज्यगीत, सरकारने जारी केले आदेश, Jai Jai Maharashtra maza, “जय जय महाराष्ट्र माझा…”

Jai Jai Maharashtra maza : शाळांमध्ये प्रार्थना, प्रतिज्ञा नियमित होत असते. मुलांमध्ये चांगले संस्कार निर्माण व्हावे, देशभक्ती निर्माण व्हावी, भारतीय संस्कृतीची त्यांना माहिती व्हावी, यासाठी शाळांमध्ये नियमित राष्ट्रगीत, प्रार्थना, प्रतिज्ञा होत असते.आता राज्य सरकारकडून आणखी एका गीताचा त्यात समावेश करण्यात आला आहे. “जय जय महाराष्ट्र माझा…” हे राज्यगीत राज्यातील शाळांमध्ये नियमित म्हटले जाणार आहे. त्यासंदर्भात शासनाकडून आदेश काढण्यात आले आहे.विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची गौरवगाथा या गीताच्या माध्यमातून कळणार आहे.

New state anthem to be sung in schools in Maharashtra along with national anthem, prayer, Maharashtra government issued order, Jai Jai Maharashtra maza

महाराष्ट्र राज्य सरकारने 31 जानेवारी 2023 च्या मंत्रिमंडळ बैठकीत “जय जय महाराष्ट्र माझा…” या गीतास राज्यगीताचा दर्जा दिला. वर्षभरापूर्वी हे गीत राज्यगीत झाले. कवीवर्य राजा निलकंठ बढे यांच्या गीतातील दोन चरणे राज्यगीत म्हणून स्वीकारण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी (19 फेब्रुवारी 2023) महाराष्ट्र राज्यगीत म्हणून “जय जय महाराष्ट्र माझा” महाराष्ट्र राज्यगीत म्हणून स्वीकारण्यात आले.

“जय जय महाराष्ट्र माझा” या गीताला राज्यगीताचा दर्जा देऊनही या गीताला त्याचा उचित सन्मान मिळत नव्हता. कोणत्याही शैक्षणिक संस्थेत हे राज्यगीत गायलं वा वाजवलं जात नव्हतं, याबाबतअमित ठाकरे यांनी मराठी भाषा गौरव दिनी (२७ फेब्रुवारी २०२४ रोजी) मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना पत्र लिहून ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. प्रत्येक शैक्षणिक संस्थेत राज्यगीत वाजविले अन् गायिले जावे अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली होती.

अखेर राज्याच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने अमित ठाकरे यांच्या मागणीनंतर राज्यगीताच्या अंमलबजावणीबाबत शासन आदेश / परिपत्रक काढले आहे. त्यानुसार, “सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या प्रत्येक शाळेत दररोजचे वर्ग सुरू होताना राष्ट्रगीत/ प्रार्थनेसोबत राज्यगीत वाजवले/ गायले जाईल, याची दक्षता शाळा व्यवस्थापनांनी घ्यायची आहे. या सूचनेचे पालन होत आहे ना, याची दक्षता सर्व विभागीय शालेय शिक्षण उपसंचालकांनी घ्यावयाची आहे असे खाली दिलेल्या शासन निर्णयात म्हटले आहे.

New state anthem to be sung in schools in Maharashtra along with national anthem, prayer, Maharashtra government issued order, Jai Jai Maharashtra maza