Avinash Dhanave Pune : आधी गोळ्या घातल्या मग कोयत्याने सपासप वार, हाॅटेलमध्ये जेवणासाठी बसलेल्या सराईत गुन्हेगाराची हत्या, घटनेचा थरारक व्हिडीओ आला समोर

Avinash Dhanave Pune | 17 मार्च 2024 :  पुणे शहर आणि जिल्ह्यात गुन्हेगार टोळ्यांचा उद्रेक वाढला आहे. खून, मारामाऱ्या, लुटमार, दहशत निर्माण करणे, खंडणी मागणे असे प्रकार नित्याचे झाले आहेत. त्यातच ग्रामीण भागातही गँगवॉरचे लोण पसरू लागले आहे, यातूनच पुणे जिल्ह्यात खुनाची एक खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.एखाद्या चित्रपटापेक्षाही थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या घटनेने मोठी खळबळ उडवून दिली आहे.(Avinash Dhanave News)

Avinash Dhanave Pune, First shot, then attacked by coyote, murder of  criminal in hotel sitting for dinner,  thrilling video of incident has surfaced. indapur murder news, pune, aalandi,

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर बाह्यवळणावर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये अविनाश बाळू धनवे रा आळंदी (Avinash Balu Dhanave Aalandi Pune) हा आपल्या मित्रांसह जेवणासाठी बसला होता. जेवण येण्याआधी हाॅटेलमध्ये काही युवक घुसले त्यांनी अविनाश धनवे (Avinash Dhanave) याची गोळ्या घालून त्यानंतर कोयत्याने वार करून हत्या (murder) केली. या हत्याकांडाच्या घटनेने मोठी खळबळ उडवून दिली आहे घटनास्थळाहून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहे. (Avinash Dhanave murder news)

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील (Pune Solapur Highway) इंदापूर बाह्यवळणावर हॉटेल जगदंबा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट (Hotel Jagdamba Indapur) आहे. या ठिकाणी जेवण करण्यासाठी अविनाश धनवे यांच्यासह चार युवक बसले होते. त्यांनी जेवणाची ऑर्डर दिली. त्यानंतर ते जेवण येण्याची वाट पाहू लागले. त्यांच्या गप्पाही रंगल्या होत्या. परंतु पुढे काय घडणार आहे, याची चौघांना कल्पना नव्हती.

चौघे जण जेवणासाठी बसलेले असताना दोन युवक हॉटेलमध्ये घुसले. त्यांनी थैलीत आणलेली पिस्तूल काढले आणि चौघांपैकी अविनाशवर गोळीबार सुरु केला. त्यानंतर आणखी काय युवक आले. त्यांनी अविनाशवर कोयत्याने वार सुरु केले. त्यानंतर काही सेंकदात सर्व जण हत्या करुन फरार झाले. (Avinash dhanave murder case)

यावेळी अविनाशसोबत असणारे तिघे प्रचंड घाबरले. त्यांनी पळ काढला. ही सर्व घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे.शनिवारी सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. दरम्यान या हल्लाची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरली. त्यानंतर हॉटेलमध्ये मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे.मयत अविनाश धनवे हा गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचा आहे. गुन्हेगारीच्या वादातूनच त्याची हत्या झाली असण्याची शक्यता आहे. (Avinash dhanave pune news)

कोण आहे अविनाश धनवे ?

अविनाश धनवे हा आळंदीमधील कोयता गॅंगचा म्होरक्या होता. गेली पंधरा वर्षापासून तो गुन्हेगारी क्षेत्रात होता. त्याच्यावर आळंदी आणि भोसरी पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहे. तो येरवडा कारागृहात असताना त्या ठिकाणी त्याची काही कैद्यांसोबत हाणामारी झाली होती. (Avinash Dhanave murder news pune indapur)

पहा घटनेचा थरारक व्हिडीओ 👇