जामखेड : फक्राबाद येथे 35 लाभार्थ्यांना सिंचन विहीरींच्या कार्यारंभ आदेशाचे वाटप । महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना अधिनियम 2005

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथे सिंचन विहीरींच्या कामांना मंजुरी मिळावी यासाठी अजय सातव मित्रमंडळाने हाती घेतलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना अधिनियम 2005 अंतर्गत फक्राबाद गावासाठी 35 सिंचन विहीरींना मंजुरी मिळाली आहे. याबाबत जामखेड पंचायत समितीकडून जारी करण्यात आलेल्या कार्यारंभ आदेशाचे वाटप नुकतेच लाभार्थ्यांना करण्यात आले.आमदार प्रा राम शिंदे यांच्या माध्यमांतून फक्राबादमधील शेतकऱ्यांना सिंचन विहीरींचा लाभ मिळाला आहे. फक्राबाद येथील शेतकऱ्यांना वैयक्तीक सिंचन विहीरींचा लाभ मिळावा यासाठी अजय सातव, संतोष राऊत, परसराम राऊत यांनी यशस्वी पाठपुरावा केला. तसेच गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी मोलाचे सहकार्य केले.

Jamkhed, Distribution of Commencement Order for irrigation wells to 35 beneficiaries at Fakhrabad, Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme Act 2005, jamkhed latest news today,

जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सिंचन विहीरीचा लाभ व्हावा याकरिता अजय सातव मित्र मंडळ व भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमदार प्रा राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा हाती घेतला होता. सिंचन विहीरींचे प्रस्ताव तयार करणे, त्याला मंजुरी मिळवणे यासह आदी कामे त्यांनी हाती घेतली होती. फक्राबाद मधील 35 सिंचन विहिरींच्या कामांसाठी 1 कोटी 40 लाख रूपये मंजुर झाले आहेत. 35 शेतकऱ्यांना एका सिंचन विहिरीसाठी प्रत्येकी चार लाख रुपये अनुदान मिळणार आहे. यामुळे शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

फक्राबाद येथील संतोष हरिभाऊ राऊत, निलावती बाजीराव राऊत, दशरथ तुकाराम राऊत, दत्तात्रय पांडुरंग उबाळे, मंगल माणिक जाधव,अर्जून बाबू उबाळे, हरिदास रोहिदास मोहळकर, कांतीलाल संतराम राऊत, आशाबाई सतिश जायभाय, नाना नवनाथ उबाळे, भाऊसाहेब सुंदरदास शिंदे, भागवत शिवाजी खुणे, कलावती नामदेव राऊत, अशोक अंकुश राऊत, मिठू श्रीराम राऊत, किसन बापुराव उबाळे, गोरख भानुदास राऊत, विठ्ठल शंभू मोहळकर, यास्मिन हाज्जू शेख, शरद मारूती उबाळे, भिवा बारकु राऊत, केरबा जयवंता राऊत, योगीनाथ जगन्नाथ जायभाय, भाऊसाहेब जयवंता राऊत, शोभा बाळू सानप, नारायण भाऊराव सानप,अश्विनी रावसाहेब जायभाय, विशाल मारूती जगताप, विजयकुमार श्रीराम राऊत, विष्णू साधू राऊत, विजया दिनकर राऊत, आशा दिगांबर शिंदे, चित्रा चंद्रकांत राऊत, भाऊसाहेब शंकर राऊत या 35 लाभार्थ्यांना वैयक्तीक सिंचन विहीर कार्यारंभ आदेशाचे वाटप नुकतेच करण्यात आले.

यावेळी आमदार प्रा.राम शिंदे यांचे स्वीय सहायक अजय सातव, मार्केट कमिटीचे संचालक नारायण तात्या जायभाय, युवा नेते मकरंद राऊत, मिठू राऊत, पांडुरंग शिंदे, सुखदेव सातव, महादेव सातव, राहुल राऊत सर, महादेव जायभाय, पोलीस पाटील योगेश जायभाय, ग्रामपंचायत सदस्य गहिनाथ जायभाय, परसराम राऊत, सोसायटीचे व्हॉइस चेअरमन संतोष राऊत, जिल्हा परिषद स्कूल कमिटीचे अध्यक्ष शरद उबाळे, पंढरीनाथ गणगे, युवा उद्योजक उत्तम शिंदे, युवा उद्योजक विजय सातव, शांतिलाल जायभाय मेजर, संजय राऊत सर, मिलिंद राऊत, कृष्णा उबाळे सह आदी उपस्थित होते.

जामखेड तालुका हा अवर्षणप्रवण क्षेत्रात येत असल्यामुळे मोठा सिंचन प्रकल्प नाही.सिंचन विहीरीच्या पाण्यावर शेती अवलंबून आहे.त्यामुळे सिंचन विहीरी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहेत. त्यामुळे जामखेड तालुक्यात मनरेगा अंतर्गत वैयक्तीक सिंचन विहीरींच्या कामांना गती मिळावी यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. आमदार प्रा.राम शिंदे यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी हाती घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या वैयक्तीक लाभाच्या सिंचन विहीरींचे कामे जामखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरु आहेत

सिंचन विहीरींचे जास्तीत जास्त कामे झाल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना आपल्या शेतात शाश्वत पाण्याची सोय होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मोठी मदत होणार आहे. तालुक्याच्या सिंचनात वाढ होण्यास यातून मदत होईल. शासनाची लखपती शेतकरी ही योजना या माध्यमांतून यशस्वी होण्यास मदत होणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्यास ही योजना किफायतशीर ठरणार आहे, या योजनेचा फक्राबाद येथील शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होणार आहे. फक्राबाद येथील 35 शेतकऱ्यांना सिंचन विहीरी मंजुर झाल्या आहेत. यामुळे शेतकरी बांधवांकडून आमदार प्रा राम शिंदे आणि गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांचे आभार मानले जात आहेत.

shital collection jamkhed