Central Railway Bharti 2022 maharashtra : मध्य रेल्वे (महाराष्ट्र) 2422 जागांची मेगा भरती सुरु, 10वी व ITI उत्तीर्ण उमेदवारांना मिळणार संधी

Central Railway Bharti 2022 Maharashtra : बेरोजगार तरूणांसाठी मध्य रेल्वेने रेल्वेत नोकरी करण्याची मोठी संधी आणली आहे. दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण असलेल्या तरुणांसाठी मध्य रेल्वेने मेगा भरती काढली आहे.मध्य रेल्वेने (Central Railway Bharti 2022) अप्रेंटिस पदाच्या 2422 पदांसाठी बंपर मेगाभरती जाहीर केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 17 जानेवारी 2020 पासून सुरू झाली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट rrccr.com द्वारे 16 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज करू शकतात.Central Railway recruitment 2022

एकूण जागा : 2422

पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) (Central Railway Apprentice bharti 2022 maharashtra)

विभाग आणि पद संख्या
1) मुंबई 1659
2) भुसावळ 418
3) पुणे 152
4) नागपूर 114
5) सोलापूर 79

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये NCVT (फिटर/वेल्डर/कारपेंटर/पेंटर/टेलर/इलेक्ट्रिशियन/मशीनिस्ट/PASAA/मेकॅनिक डिझेल/लॅब असिस्टंट/टर्नर/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/शीट मेटल वर्कर/विंडर/MMTM/टूल & डाय मेकर/ मेकॅनिक मोटर वेहिकल/IT & इलेक्ट्रॉनिक सिस्टम मेंटेनन्स)

वयाची अट: 17 जानेवारी 2022 रोजी 15 ते 24 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मध्य रेल्वे (महाराष्ट्र)

परीक्षा फी : जनरल/ओबीसी ₹100/-   [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

अपलोड करायची कागदपत्रे: SSC (इयत्ता 10वी) किंवा त्याच्या समकक्ष गुणपत्रिका.

जन्मतारखेच्या पुराव्यासाठी प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी किंवा त्याच्या समकक्ष प्रमाणपत्र किंवा जन्मतारीख दर्शविणारी गुणपत्रिका किंवा जन्मतारीख दर्शविणारी शाळा सोडल्याचा दाखला).

ट्रेडच्या सर्व सेमिस्टरसाठी एकत्रित गुणपत्रिका- ज्यामध्ये अर्ज केले / तात्पुरते राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र गुण दर्शवितात.

NCVT द्वारे जारी केलेले राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र किंवा NCVT/SCVT द्वारे जारी केलेले तात्पुरते राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र.

SC/ST/OBC उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र, जिथे लागू असेल.

PWD उमेदवाराच्या बाबतीत अपंगत्व प्रमाणपत्र.

डिस्चार्ज सर्टिफिकेट / सर्व्हिंग सर्टिफिकेट, उमेदवारांच्या बाबतीत, माजी सैनिक कोट्यावर अर्ज केला जातो.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 फेब्रुवारी 2022

अधिकृत संकेतस्थळ : www.rrccr.com