पोस्टल मतामुळे लागली लाॅटरी ( The lottery started because of the postal vote)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा  : धाकधूक वाढवणारे निवडणुक निकाल समोर येत होते, जय पराजयाच्या छटा मतमोजणी केंद्रात दिसत होत्या.उत्साही कार्यकर्ते विजयाचा जल्लोष करणार तोच पोलिस यंत्रणा तत्काळ दरडावून शांततेत मतदान केंद्र सोडण्याच्या सुचना उमेदवारांना करत होते असे एकिकडे चित्र असतानाच मतमोजणी केंद्रात एक नाट्यमय घडामोड घडत होती. दिघोळ ग्रामपंचायतची मतमोजणी सुरू होती. वार्ड क्रमांक तीनच्या मतमोजणीत रंजना पिराजी दगडे व शकुंतला पोपट तागड या दोन उमेदवारांना मशीनमध्ये समसमान 191 मते पडली होती.आता विजयी कोण ठरणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. परंतु एका पोस्टल मताने रंजना दगडे यांचे नशिब फळफळले. अवघ्या एका पोस्टल मताने रंजना दगडे विजयी झाल्या. हा निकाल सर्वाधिक चर्चेचा ठरला. (The lottery started because of the postal vote)