Sachin Tendulkar Kashmir Video : पृथ्वीवरच्या स्वर्गातील रस्त्यांवर क्रिकेट खेळतोय क्रिकेटचा देव, सचिन तेंडुलकरचा काश्मीरमधील व्हिडीओ व्हायरल !

Sachin Tendulkar Kashmir Video : भारतरत्न सचिन तेंडुलकर हा पृथ्वीवरील स्वर्गाच्या अर्थात काश्मीरच्या दौर्‍यावर आहे. या दौर्‍यात सचिन तेंडुलकर याने एका महामार्गावर क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला आहे. सचिनने हा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर करत A Match in HEAVEN असे म्हटले आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाला आहे.

जगातील सर्वात सुंदर अश्या ठिकाणांपैकी एक असलेल्या जम्मू आणि काश्मीरचा प्रदेश म्हणजे जणू पृथ्वीवरील स्वर्गच.. हिमालयाचे उंच पर्वत.. बर्फाच्छादित डोंगर.. हिरवळीने नटलेला परिसर.. दर्‍या खोर्‍यातून वाहणाऱ्या हिमनद्या.. रंगबिरंगी फुलांनी नटलेला परिसर.. अश्या या सर्वांग सुंदर निसर्ग सौंदर्याने नटलेल्या जम्मू आणि काश्मीरची सफर व्हावी, तिथला परिसर, संस्कृती, लोकजीवन, निसर्ग डोळ्यांत साठवून घ्यावा हे प्रत्येकाचेच स्वप्न असते. निसर्गाचे सर्वांगसुंदर रूप पाहण्यासाठी भारताचा मास्टर ब्लास्टर भारतरत्न तथा क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर सध्या पृथ्वीवरील स्वर्गाच्या दौर्‍यावर आहे. (Sachin Tendulkar Kashmir Video)

भारताचा माजी फलंदाज, क्रिकेटचा देव, मास्टरब्लास्टर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर म्हणजे तीन पिढ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवेलला क्रिकेटचा अनभिज्ञ सम्राट. भारतासह जगभरात सचिनचे चाहते आहेत, गल्लीबोळात, रस्त्यावर, दरी-डोंगरात, गावखेड्यात आणि कानाकोपऱ्यातही सचिन तेंलुडकर हे नाव माहित नाही असे कोणीच सापडणार नाही. कारण, सचिनने भारतीय क्रिकेटसाठी दिलेले योगदान, भारतीयाच्या मनात विजयाची ज्योत त्याने पेटवत ठेवली. त्यामुळेच,आजही गावागावात, गल्ली बोळात सचिन बनण्याचे स्वप्न घेऊन क्रिकेट खेळले जाते, अश्याच एका गल्ली क्रिकेट खेळणाऱ्या पोरांमध्ये जर क्रिकेटचा देव अवतरला आणि तोही त्यांच्यासोबत खेळायला लागला तर? हे शक्य वाटतं नाही ना? पण हे घडलयं, तेही पृथ्वीवरील स्वर्गाच्या रस्त्यांवर. (Sachin Tendulkar Kashmir Video)

Sachin Tendulkar Kashmir Video, God of cricket, Sachin Tendulkar playing cricket on the streets of heaven on earth, video from Kashmir goes viral,

पृथ्वीतलावावरील स्वर्ग म्हणजे आपलं जम्मू-काश्मीर. देशाच्या सीमारेषेवरील निसर्ग सौंदर्याचं वरदान लाभलेला हा प्रदेश सुंदरतेमुळे आणि दहशतवादी कारवायांमुळेही कायम चर्चेत असतो. याच जम्मू काश्मीरमध्ये सचिन तेंडुलकर सहकुटुंब फिरायला गेला आहे. यावेळी, काश्मीरच्या एका रस्त्यावर क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांसोबत सचिनने क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. (Sachin Tendulkar Kashmir Video)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानावर जागतिक विक्रमांचे मनोरे रचणाऱ्या सचिनने काश्मीरमधील मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. सचिनने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन येथील क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, चला कोण आहे तुमच्यातील गोलंदाज, असे म्हणत मुलांना चेंडू फेकण्यासाठी सांगतो. त्यानंतर, तेथील युवक सचिनसोबत क्रिकेट खेळताना दिसतात आहेत. सर्वच जण सचिनला क्रिकेट खेळताना पाहून आनंदीत झाल्याचे दिसत आहेत (Sachin Tendulkar Kashmir Video)

सचिनने काही फटके मारल्याचंही व्हिडिओत दिसून येत आहे. तर, शेवटचा चेंडू खेळताना सचिन बॅट उलटी पकडतो आणि या चेंडूवर मला आऊट करा असेही म्हणतो. मात्र, शेवटचा चेंडूही सचिने दमदारपणे पुढे मारतो, तेव्हा एकच टाळ्यांचा कडकडाट होतो. दरम्यान, यावेळी, सचिनच्या सुरक्षेसाठी सैन्य दलातील जवानही येथील रस्त्यावर तैनात असल्याचे दिसून येते. (Sachin Tendulkar Kashmir Video)

विशेष म्हणजे काश्मीरमधील ही मुले क्रिकेट खेळताना स्टंप म्हणून रॉकेलचं कॅण्ड आणि पुठ्ठ्याच्या बॉक्सचा वापर केल्याचंही व्हिडिओत पाहायला मिळत आहे. त्यामुळे, अगदी गल्लीस्टाईल क्रिकेट खेळून सचिनने काश्मीरच्या युवकांना आणि नेटीझन्सला मोठा आनंद दिला आहे. (Sachin Tendulkar Kashmir Video)

Sachin Tendulkar Kashmir Video 👇