काठावरचे बहुमत : सदस्य सहलीवर (Majority on the edge: on member trips)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : सोमवारी जामखेड तालुक्यातील 39 ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले. या निकालात भाजपाचे तालुुक्यातील ग्रामपंचायतीवरील वर्चस्व मोडीत निघाले. तरूणाईच्या हाती बहुतांश ग्रामपंचायतींचा कारभार जनतेने सोपवला. यापुढे गावगाड्यात नव्या दमाचे कारभारी गावकारभार करताना दिसतील. काठावर बहूमत मिळालेल्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायतीचे सदस्य सहलीवर रवाना झाले आहेत.(Majority on the edge: on member trips)

जामखेड तालुक्यात सर्वाधिक चुरशीच्या ठरलेल्या पिंपरखेड हसनाबाद ग्रामपंचायतमध्ये विद्यमान सरपंच बापुराव ढवळे यांच्या गटाला सत्ता राखण्यात यश आले खरे पण त्यांना काठावरचे बहूमत मिळाले. तर दुसरीकडे अरणगाव ग्रामपंचायतमध्ये सत्ताधारी भाजपच्या गटाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना चार जागा मिळाल्या. तर विरोधी राष्ट्रवादीच्या गटाने सर्वाधिक 05 जागा जागा जिंकल्या परंतु पॅनलप्रमुख संतोष निगुडे यांचा पराभव झाला. येथील निवडणुकीत दोन अपक्षांनी मारलेली बाजी लक्षवेधी ठरली.

अरणगाव व पिंपरखेड – हसनाबाद ग्रामपंचायतचे निकाल हाती येताच काठावरचे बहूमत मिळताच सदस्य फोडोफोडी होऊ नये यासाठी पॅनलप्रमुखांनी आपले सदस्य अज्ञातस्थळी सहलीवर रवाना केले आहेत. सरपंचपदाची निवड होईपर्यंत हे सदस्य आता सहलीवर असतील. (Majority on the edge: on member trips)