सरकारी कामात अडथळा, फरार आरोपींना जामखेड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार दोघा आरोपींच्या मुसक्या आवळण्याची धडाकेबाज कारवाई जामखेड पोलिस स्टेशनच्या गुन्हा शोध पथकाने पार पाडली.

याबाबत सविस्तर असे की,जामखेड नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात गोंधळ घालून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला गु.र.नं 138 /2022 भा. द. वी कलम 353, 332, 34 प्रमाणे 06 एप्रिल 2022 रोजी दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

संत वामनभाऊ महाराज दिंडीचा पहिला रिंगण सोहळा उत्साहात संपन्न

तेव्हापासुन सदर गुन्ह्यातील आरोपी फरार होते. काल 01 जूलै 2022 रोजी सदर गुन्ह्यातील आरोपी संतोष बबन गव्हाळे, रा. आरोळेवस्ती, जामखेङ व तुषार महादेव शिरोळे, रा. मिलिंदनगर, जामखेड यांना अटक करण्याची कारवाई गुन्हा शोध पथकाने पार पाडली.अटक केलेल्या आरोपींना जामखेड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 4 जुलै 2022 पर्यंत पोलीस कस्टङी दिली आहे.

पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजु थोरात, पोलिस नाईक संग्राम जाधव, अविनाश ढेरे, पोलिस काँस्टेेबल संदिप राऊत, संदिप आजबे, अरुण पवार, विजय कोळी, आबासाहेब आवारे यांनी सदरची कामगिरी केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राजु थोरात हे करीत आहेत.