Kusadgaon SRPF Group 19 | कुसडगाव SRPF प्रशिक्षण केंद्राच्या बांधकामासाठी 35 कोटींची वर्क ऑर्डर

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । Kusadgaon srpf group 19 । जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथे होणाऱ्या राज्य राखीव पोलिस बल (SRPF) प्रशिक्षण केंद्राच्या बांधकामासाठी तब्बल 34.37 कोटीची टेंडर प्रक्रिया पुर्ण होऊन या कामाचे कार्यादेश (work order) देण्यात आले आहेत. यामुळे कुसडगाव SRPF केंद्राच्या कामास लवकरच सुरूवात होणार आहे. (35 crore work order for construction of Kusadgaon SRPF Training Center )

जामखेड तालुक्यातील कुसडगांव येथे मंजूर झालेले एस.आर.पी.एफ.चे प्रशिक्षण केंद्र जळगाव जिल्ह्यात हलविण्यात आले होते. कर्जत-जामखेड मतदारसंघावर अन्याय झाल्याचे सांगत आमदार रोहित पवार (MLA Rohit pawar ) यांनी शासन स्तरावर पाठपुरावा केला.

तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना 14 जानेवारी 2020 रोजी पत्र देऊन एसआरपीएफचे केंद्र पुन्हा मतदारसंघात आणण्याची मागणी केली.त्यानुसार योग्य ती कार्यवाही होऊन 26 जून 2020 रोजी हे केंद्र कुसडगांव (ता. जामखेड) येथे आणण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला.

दरम्यान, 8 नोव्हेंबर 2021 मध्ये कुसडगावच्या एसआरपीएफ केंद्रामध्ये पोलिस भरतीसाठी दौंड येथील एसआरपीएफचे समादेशक यांना प्राधिकृत करण्यात आले. या सर्व प्रक्रियेत आमदार रोहित पवार यांनी गृहमंत्र्यांसह एसआरपीएफच्या अतिरिक्त पेालिस महासंचालक अर्चना त्यागी (SRPF Additional Director General of Police Archana Tyagi) यांच्याशी वेळोवेळी बैठका घेतल्या.

कुसडगावच्या जागेची प्रत्यक्ष पाहणीही केली होती.अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आले.कुसडगाव येथील SRPF केंद्राचे बांधकाम करण्यासाठीची 34 कोटी 37 लाख रुपयांची टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन 22 जून 2022 रोजी याबाबतचे कार्यादेश देण्यात आला आहे.

राज्य राखीव पोलिस बल (SRPF) प्रशिक्षण केंद्रावरून अहमदनगर आणि जळगाव जिल्ह्यात मोठे राजकारण तापले होते. आमदार रोहित पवार यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावत सदरचे SRPF प्रशिक्षण केंद्र जामखेड तालुक्यात आणण्यात यश मिळवले आहे.