संत वामनभाऊ महाराज दिंडीचा पहिला रिंगण सोहळा उत्साहात संपन्न

जामखेड टाइम्स वृत्तसेवा: विठुरायाच्या भेटीसाठी पंढरीला निघालेल्या श्री क्षेत्र गहिनीनाथगड येेथील संत वामनभाऊ महाराज दिंडीचे जमादारवाडीच्या संत वामनभाऊ महाराज गडावर मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत संत वामनभाऊ महाराज पालखीचे पहिले रिंगण भक्तिमय वातावरण पार पडले.

श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संत वामनभाऊ महाराज यांची पालखी गहिनीनाथ गड येथून बुधवार दि.29 जून 2022 रोजी पंढरपुरकडे मार्गस्थ झाली.

first arena ceremony of Saint Vamanbhau maharaj Dindi was held in Jamadarwadi

गहिनीनाथ गड, निवडुंगा, वाहली, सावरगाव, केकाणवस्ती, वनवेवाडी, मातकुळी असा प्रवास करत शुक्रवारी सकाळी जामखेड तालुक्यातील जांबवाडी येथे दिंंडीचे आगमन झाले. हजारो वारकरी या दिंडीत सहभागी झाले आहेत.

first arena ceremony of Saint Vamanbhau maharaj Dindi was held in Jamadarwadi

जामखेड शहरात संंत वामनभाऊंच्या दिंडीचे आगमन होताच भक्तांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. वारकऱ्यांसाठी शहरात ठिकठिकाणी फळे, चहा, बिस्कीटे पाणी याची व्यवस्था करण्यात आली होती. जामखेड शहरातील श्रीविठ्ठल मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

first arena ceremony of Saint Vamanbhau maharaj Dindi was held in Jamadarwadi

दिंडीतील सहभागी वारकऱ्यांसाठी  जदाळेवस्ती येेथे भोजन व्यवस्था करण्यात आली होती.या ठिकाणी भोजन करून दिंडीचे जमादारवाडी येथील संत वामनभाऊ मंदिर परिसरात दुपारी आगमन झाले. त्यानंतर या दिंडीचा पहिला रिंगण सोहळा पार पडला. हजारो वारकरी यात सहभागी झाले होते. शुक्रवारी दुपारी तीन वाजता हा सोहळा पार पडला.

first arena ceremony of Saint Vamanbhau maharaj Dindi was held in Jamadarwadi