जामखेड पत्रकार संघात उभी फुट,11 जणांनी पुकारले बंड

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेड पत्रकार संघामध्ये रविवारी मोठी फुट पडली. या पत्रकार संघातील तब्बल 11 सदस्यांनी अध्यक्षाच्या मनमानी कारभाराला कंटाळून बंड पुकारले आहे. त्या सर्व सदस्यांनी सामूहिक राजीनामे दिल्याने जामखेड पत्रकार संघामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

रविवारी दिनांक 3 जुलै रोजी जामखेड पत्रकार संघातील नाराज पत्रकारांची जामखेडच्या शासकीय विश्रामगृहामध्ये बैठक पार पडली. या बैठकीमध्ये जामखेेड पत्रकार संघटनेच्या अध्यक्षाच्या मनमानी कारभारावर नाराज असलेल्या पत्रकारांनी बंड पुकारत सामूहिकपणे पत्रकार संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये तीन पदाधिकाऱ्यांसह आठ सदस्यांनी सामूहिक राजीनामा दिले आहेत.

जामखेड पत्रकार संघटनेतून बाहेर पडलेले सदस्य खालील प्रमाणे

 1. सुदाम वराट – खजिनदार
 2. अविनाश बोधले सहसचिव
 3. धनंजय पवार – प्रसिद्धीप्रमुख
 4. सय्यद शाकीर – सदस्य
 5. अशोक वीर – सदस्य
 6. अजय अवसरे – सदस्य
 7. फारुख शेख – सदस्य
 8. राजेश भोगील – सदस्य
 9. किरण रेडे – सदस्य
 10. संतोष गर्जे- सदस्य
 11. वामन डोंगर – सदस्य