जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात सुरु असलेल्या आषाढी यात्रेतील गर्दीचा फायदा उचलत लहान मुलांच्या गळ्यातील सोन्याच्या दागिण्यांची चोरी करणाऱ्या सराईत महिला गुन्हेगारास अटक करण्याची धडक कारवाई जामखेड पोलिसांनी पार पाडली.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील नान्नज व जवळा येथे सालाबादप्रमाणे आषाढी एकादशी दिवशी 6 दिवस रथयात्रा भरते. या रथयात्रेनिमीत्त जवळा गावातील शेजारी असलेल्या वाड्यावस्त्यावरील लोक यात्रा पाहण्यासाठी तसेच रथाचे दर्शन घेण्यासाठी जवळा गावात मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामुळे येथे सुमारे 15 ते 20 हजार लोकांची गर्दी होत असते. या गर्दीचा फायदा घेवुन चोरी करण्याचे प्रमाण दरवर्षी वाढलेले असते. त्यामुळे यावर्षी अशा चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी जामखेड पोलीस स्टेशनकडुन सरकारी गणवेशात तसेच साधे वेशात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दिनांक 03/07/2023 रोजी दुपारी 2/00 वा. चे सुमारास जवळा गावातील 1) सोमनाथ महादेव जाधव रा.जवळा ता. जामखेड यांचे लहान मुलाचे 300 मिली ग्रॅमचे सोन्याचे बदाम, 2) सुनिल बिभीषण शिंगटे रा. पाडळी ता.करमाळा लहान मुलाचे 1 ग्रॅमचे सोन्याचे बदाम, 3) हनुमंत रामभाऊ सुरवसे रा. देवळाली ता. भुम लहान मुलीचे 300 मिली ग्रॅमचे सोन्याचे बदाम, 4) सुभाष रामभाऊ पागीरे रा. मतेवाडी ता.जामखेड लहान मुलीचे 500 मिली ग्रॅमचे सोन्याचे बदाम असे सुमारे 2 ग्रॅम 100 मिली ग्रॅम सोन्याचे बदाम जवळा गावातील यात्रेत चोरीस गेले होते, अशी माहिती तेथे बंदोबस्ताकरीता असणारे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना मिळाली त्यांनी तात्काळ हालचाल करून जवळा गावातच जवळेश्वर मंदीराजवळ एक संशयीत महिला आढळुन आली तिला तात्काळ महिला पोलीस अंमलदार पुजा धांडे, होमगार्ड लोंढे यांनी ताब्यात घेतले.
सदर आरोपी महीला हीस जामखेड पोलीस स्टेशन येथे आणुन तिचे नाव गाव विचारले असता तिने तिचे नाव यास्मीन ठाकुरसिंग भोसले रा. भानस हिवरा, ता.नेवासा जि.अहमदनगर असे सांगितले व तिचीमहिला अंमलदार यांनी झडती घेतली असता तिच्याकडे वरील वर्णनाचे 2 ग्रॅम 100 मिली वजनाचे चार सोन्याचे बदाम मिळुन आले आहेत. त्याबाबत फिर्यादी सोमनाथ महादेव जाधव वय 27 वर्षे रा. जवळा ता. जामखेड यांनी जामखेड पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असुन जामखेड पोलीस स्टेशनला गु. रजि. नं. 287/2023 भा.द.वि.क. 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अजय साठे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे, जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई अनिल भारती, पोना.संतोष कोपनर, पोना.अजय साठे,पोकॉ.प्रकाश मांडगे,पोकॉ. कुलदिप घोळवे, पोकॉ. नवनाथ शेकडे, पोकॉ. देवीदास पळसे,पोकॉ.सतीष दळवी, महिला पोलिस काँन्टेबल पुजा धांडे, महिला होमगार्ड लोंढे यांनी केली आहे.
आरोपी यास्मीन ठाकुरसिंग भोसले रा. भानस हिवरा, ता.नेवासा जि.अहमदनगर हीचेवर दाखल असलेले गुन्हे
1) नारायणगाव पोलीस स्टेशन, जुन्नर जि.पुणे गु. रजि.नं.201/2019 भा.द.वि.क. 379,34 2) येवला तालुका पोलीस स्टेशन, येवला जि.नाशिक गु. रजि.नं. 46/2023 भा.द.वि.क. 379 3) जामखेड पोलीस स्टेशन गु. रजि.नं. 287/2023 भा.द.वि.क. 379 प्रमाणे